WTC Points Table saam tv
Sports

WTC Points Table: भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; फायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण, पाहा

WTC Latest Points Table: पर्थ टेस्ट जिंकून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये देखील पहिलं स्थान पटकावलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पर्थ टेस्टचा कौल अखेर टीम इंडियाच्या बाजूने लागला आहे. या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर सिरीजच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. २९५ रन्सने हा सामना जिंकत टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये देखील पहिलं स्थान पटकावलं आहे.

भारताच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये उलटफेर

पर्थ टेस्टमधील विजयानंतर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) पॉईंट्स टेबलमध् अग्रस्थान मिळवलंय. आता भारतीय संघ पुन्हा WTC टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 15 सामन्यांत 9 विजय, 5 पराभव आणि एक बरोबरीत 110 गुण असून याची टक्केवारी ६१.११ टक्के आहे.

याशिवाय ऑस्ट्रेलिया WTC टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरली असून कांगारूंच्या टीमचे 13 सामन्यांत 8 विजय, 4 पराभव आणि एक बरोबरीत 90 पॉईंट्स आहेत. ऑस्ट्रेलियाच्या गुणांची टक्केवारी 57.69 आहे.

फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाचं कसं आहे समीकरण?

आता सर्वांच्या मनात प्रश्न आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियासाठी कसं समीकरणं आहे? WTC अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित चार टेस्टपैकी तीन जिंकावे लागणार आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित ठेवावा लागेल. यावेळी टीम इंडियाने एकही सामना हरला तर इतर टीमच्या निकालावर अवलंबून राहावं लागू शकतं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं हे तिसरं चक्र आहे जे 2023 ते 2025 पर्यंत आहे. आयसीसीने यासाठी पॉइंट सिस्टमशी संबंधित नियम आधीच जारी केले आहेत. टेस्ट सामना जिंकल्यास संघाला १२ पॉईंट्स, सामना अनिर्णित राहिल्यास ४ पॉईंट्स आणि सामना बरोबरीत सुटल्यास ६ पॉईंट्स मिळतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT