Team india saam tv
Sports

IND vs WI 1st T20: टीम इंडियाचं अनोखं द्विशतक; मैदानात उतरताच होणार मोठ्या विक्रमाची नोंद

Team India 200th T20 Match: हा सामना भारतीय संघासाठी अतिशय खास असणार आहे.

Ankush Dhavre

India vs West Indies 1st T20I:

भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांचा मालिका रंगणार आहे.या मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय खास असणार आहे.

कारण हा भारतीय संघाचा २०० वा टी-२० सामना असणार आहे.आतापर्यंत झालेल्या १९९ सामन्यांपैकी १२७ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे.यादरम्यान विराट कोहली हा भारतीय संघातील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे.

भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर हे दोन्ही संघ २५ वेळेस आमने सामना आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १७ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारतीय संघाने श्रीलंकेविरूद्ध खेळताना सर्वाधिक २९ सामने खेळले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १९ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहेय तर ९ सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या २६ सामन्यांमध्ये भारतीय संघाने १५ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. तर न्यूझीलंडविरूद्धच्या २५ सामन्यांपैकी १२ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला आहे.

किंग कोहली ठरलाय सर्वात यशस्वी फलंदाज..

भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने १०७ इनिंगमध्ये ४००८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३७ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे.

इतकेच नव्हे तर तो भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज देखील आहे. आशिया चषक आणि आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळताना त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

आज रंगणार सामना..

भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये पहिल्या टी-२० सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे.

तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. या सामन्यात युवा भारतीय फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्माला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT