team india saam tv
क्रीडा

IND vs WI 1st T20: तिलक की यशस्वी... हार्दिक कोणाला देणार पदार्पणाची संधी? पाहा प्लेइंग 11

Team India Playing 11: जाणून घ्या कशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११.

Ankush Dhavre

India vs West Indies Playing 11: भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये आजपासून ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ८ वाजता सुरू होईल.

या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा यांना पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. दरम्यान जाणून घ्या कशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११.

यशस्वी जयस्वालचं होणार पदार्पण?

आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वी जयस्वालला टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. यशस्वी जयस्वालला वेस्टइंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.

या संधीचा फायदा घेत त्याने पदार्पणात शतकी खेळी केली होती. पहिल्या टी -२० सामन्यात यशस्वी जयस्वालसह ईशान किशन डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. तर शुबमन गिलला विश्रांती दिली जाऊ शकते.

तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसन खेळताना दिसून येऊ शकतो. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. तर टी-२० चा नंबर १ खेळाडू सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी तिलक वर्माला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. त्याने मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. (Latest sports updates)

सहाव्या क्रमांकावर कर्णधार हार्दिक पंड्या खेळताना दिसून येऊ शकतो. तर सातव्या क्रमांकासाठी अक्षर पटेलला संघात स्थान दिले जाऊ शकते. तसेच वेगवान गोलंदाज म्हणून संघात उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना संधी दिली जाऊ शकते.

फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. तसेच वनडे आणि कसोटीत पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमारला टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

अशी असू शकते प्लेइंग ११..

शुबमन गिल/यशस्वी जयस्वाल, ईशान किशन, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

SCROLL FOR NEXT