ind vs sl ODI Siries Saamtv
Sports

Ind Vs SL ODI Siries: नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने, सुर्यकुमारला संधी नाही, अशी आहे Team India ची प्लेईंग 11

नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधार - रोहित शर्मा आणि दासुन शांका यांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली.

Gangappa Pujari

Ind Vs SL ODI SIries: भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. नवीन वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये खेळली जाणारी ही भारताची पहिली एकदिवसीय मालिका आहे. या मालिकेतील पहिला सामना आज गुवाहाटी येथे होणार आहे.

या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार दासुन शांकाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत प्रथम फलंदाजी करणार हे स्पष्ट आहे. नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधार - रोहित शर्मा आणि दासुन शांका यांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली.

श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने शतक झळकावले. पण, त्यानंतर वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे स्थान मिळाले नाही. सूर्यकुमारच्या जागी बांग्लादेश विरुद्धच्या वनडे मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला संघात स्थान दिले आहे. गोलंदाजीत संघ व्यवस्थापनाने कुलदीपऐवजी चहलवर विश्वास व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर, शेवटच्या टी-२० मध्ये झालेल्या संघात एकच बदल झाला आहे. महिष टीक्षानाच्या जागी दुनित वेलेझला संधी मिळाली आहे. याशिवाय दिलशान मधुशंका पदार्पण करत आहे. (Indian Cricket Team)

भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल

श्रीलंकेची (Srilanka ) प्लेइंग इलेव्हन- कुसल मेंडिस, पथम निसांका, अविष्का फर्नांडो, धनंजय डी सिल्वा, चारिथ असलंका, दासुन शांका, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वेलेझ, कसून राजित, दिलशान मधुशंका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT