India vs Sri Lanka Asia Cup Saam tv
Sports

India vs Sri Lanka Asia Cup: भारताने जिंकली लंका; आठव्यांदा पटकावला आशिया कप

India vs Sri Lanka Asia Cup: श्रीलंकेने दिलेल्या अवघ्या ५१ धावांचं आव्हान टीम इंडियाने सात षटकातच सामना जिंकला.

Vishal Gangurde

IND vs SL,Asia Cup:

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत विरद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये आशिया चषकातील अंतिम सामना झाला. टीम इंडियांच्या मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने गोलंदाजीने अवघा संघ ५० धावांवर तंबूत परतवला. श्रीलंकेने दिलेल्या अवघ्या ५१ धावांचं आव्हान टीम इंडियाने सात षटकातच पूर्ण करत मोठा विजय मिळवला आहे.

टीम इंडियाने आठव्यांदा आशिया चषक जिंकत इतिहास रचला आहे. टीम इंडिया जिंकल्यानंतर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Latest Marathi News)

इंडिया विरुद्ध श्रीलंकेदरम्यान रविवारी आशिया कपचा अंतिम सामना झाला. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजाच्या चिंधड्या उडवल्या. टीम इंडियाच्या एकट्या मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे सहा गडी बाद केले.

श्रीलंकेची टीम १५.२ षटकात ५० धावांवर तंबूत परतली. श्रीलंकेने एकदिवसीय सामन्याच्या इतिहासातील आतापर्यंतचं सर्वाधिक कमी लक्ष्य दिलं. टीम इंडियाच्या सिराजने स्फोटक गोलंदाजी करत ७ षटकात २१ धावा देऊन ६ गडी बाद केले. सिराजने एकाच षटकात ४ गडी बाद केले. तर हार्दिक पंड्याने तीन तर जसप्रीत बुमराहने एक गडी बाद करत श्रीलंकेला ५० धावांवर रोखलं.

श्रीलंकेने दिलेल्या अवघ्या ५१ धावांचं आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने ६.१ षटकात आव्हान पूर्ण करत सामना जिंकला. टीम इंडियाकडून शुबमन गिलने १९ चेंडूत २७ धावा तर ईशान किशन १८ चेंडूत नाबाद २३ धावा ठोकल्या.

टीम इंडियाने आठव्यांदा हा आशिया चषक जिंकला आहे. आशिया चषकातील मोठ्या विजयानंतर भारतीयांकडून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT