India vs Srilanka Playing 11 And Match Prediction saam tv
Sports

IND vs SL, Playing XI: फायनलपूर्वी स्टार खेळाडू संघात परतला! लंकेला आव्हान देण्यासाठी या प्लेइंग ११ सह उतरणार मैदानात

India vs Srilanka Playing 11 And Match Prediction: या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल पाहायला मिळू शकतात.

Ankush Dhavre

India vs Srilanka Playing 11 And Match Prediction:

आशिया चषकावर नाव कोरण्यासाठी भारत आणि श्रीलंकेचा संघ आमने सामने येणार आहे. हा सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळाले होते. अंतिम सामन्यासाठीही भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली गेली होती. ते खेळाडू या सामन्यात कमबॅक करताना दिसून येऊ शकतात.

ज्यात जसप्रीत बुमराह, विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू श्रीलंकेला धूळ चारण्यासाठी आमने सामने येऊ शकतात.

या फलंदाजांना मिळणार संधी..

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज शुबमन गिल हे दोघेही डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. संघातील अनुभवी फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येईल. हे तिन्ही फलंदाज टॉप ३ मध्ये करताना दिसून येतील.

यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुलला संघात स्थान दिले जाऊ शकते. तर जोरदार फॉर्ममध्ये असलेला डावखुरा फलंदाज ईशान किशन ५ व्या क्रमांकावर आणि सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या. तर सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा फलंदाजीला येऊ शकतो.

अंतिम लढतीत या गोलंदाजांना मिळणार संधी..

या संघात फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवला संधी मिळू शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला संधी दिली जाऊ शकते.

अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुदंरचा संघात समावेश करण्यात आला आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टिरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चाळीशीतही २० वर्षांच्या मुलीसारखा गुलाबी ग्लो पाहिजे? मग फेसवॉश नव्हे, वापरा 'ही' घरगुती सामग्री

काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: वसईच्या मधुबन टाऊनशिपमधील ठाकूर स्कूलमध्ये अडकलेल्या ४१ शिक्षकांची सुखरूप सुटका

Kidney Health: तुमच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी; वेळीच घ्या स्वतःची काळजी

Maharashtra Weather Update: पुण्यासह राज्यभरात धो-धो कोसळणार पाऊस, पुढील ३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT