Indian Cricket Team vs South Africa
Indian Cricket Team vs South Africa saam tv
क्रीडा | IPL

India vs South Africa : भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा T-20 सामना कधी सुरु होणार?वाचा सविस्तर माहिती

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका सुरु झाली असून आज २ ऑक्टोबरला दुसरा सामना होणार आहे. टीम इंडियाने पहिला सामना ८ विकेट्सने जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारत आज दुसरा सामनाही जिंकल्यास मालिकेवर विजयाची मोहोर उमटवून २-० ने आघाडी घेईल. (India vs South Africa T-20 Series latest news update)

ऑस्ट्रेलियात आगामी होणाऱ्या विश्वचषकासाठी (T-20 World Cup) आफ्रिके विरोधात होणारी ही मालिका टीम इंडियासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. ऑस्ट्रेलिया विरोधात नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेवर २-१ अशा फरकाने टीम इंडियाने विजय मिळवला होता. आता टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान आहे. दुसऱ्या सामन्यातही टीम इंडियाचा विजय झाला तर आफ्रिका विरोधातील टी-२० मालिकेत २-० ने आघाडी मिळेल.

कधी सुरू होणार भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा टी-२० सामना?

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी-२० सामना आज रविवारी २ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. या सामन्याची नाणेफेक सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. हा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याचे प्रसारण स्टार नेटवर्क या वाहिनीवर केलं जाणार आहे. स्टार नेटवर्कच्या वेगवेगळ्या चॅनेलवर विविध भाषांमध्ये या सामन्याचं प्रसारण केलं जाणार आहे.

घरेलू मैदानावर टीम इंडिया मालिका जिंकली नाही

जर टीम इंडियाने घरेलू मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यास एक मोठा विक्रमाला गवसणी घातली जाईल. म्हणजेच टीम इंडिया पहिल्यांदाच घरेलू मैदानावर आफ्रिका विरोधात द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकून इतिहास रचेल.आतापर्यंत आफ्रिकेने भारताविरोधात कोणतीही द्विपक्षीय मालिका गमावली नाही. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका विरुद्ध घरेलू मैदानावर तीन द्विपक्षीय मालिका खेळली आहे. यामधील पहिला मालिका २०१५ मध्ये झाली होती. त्यावेळी टीम इंडियाचा पराभव झाला होता. त्यानंतर दोन मालिका अजून झाल्या. परंतु, त्या दोन्ही मालिकांमध्ये बरोबरी झाली.

टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघांचे स्क्वॉड

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उप कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव,श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर आश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद,अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार),क्विंटन डी कॉक,रेज़ा हेंड्रिक्स,हेनरिक क्लासेन, केशव महाराज,एडन मार्करम,डेविड मिलर,लुंगी एनगिडी,एनरिक नॉर्किया,वेन पार्नेल,ड्वेन प्रिटोरियस,कगिसो रबाडा,रीले रॉसो,तबरेज़ शम्सी,ट्रिस्टन स्टब्स,यॉर्न फॉर्ट्यून,मार्को येनसन और ए.फेलुक्वायो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : काँग्रेस देशात कर्नाटक मॉडेल राबवण्याच्या प्रयत्नात, नरेंद्र मोदींची कोल्हापुरातून टीका

PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

Eknath Shinde Speech : 'धणुष्यबाण गेला पंजा आला'; कोल्हापुरातील सभेतून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Bus Fire: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट

Priyanka Gandhi: महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT