rohit sharma  saam tv news
Sports

Rohit Sharma Record: ऐतिहासिक विजयानंतर रोहितच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद! असा कारनामा करणारा आशियातील पहिलाच कर्णधार

India vs South Africa 2nd Test: केपटाऊन कसोटी जिंकताच मोठ्या कर्णधार रोहित शर्माच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa 2nd Test, Rohit Sharma Record:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला आहे. यासह ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली आहे. दरम्यान केपटाऊन कसोटी जिंकताच मोठ्या कर्णधार रोहित शर्माच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

असा कारनामा करणारा दुसराच भारतीय कर्णधार..

रोहित शर्माने कर्णधार म्हणून वनडे आणि टी -२० क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. नुकताच कसोटी क्रिकेटमध्येही त्याने ऐतिहासिक कारनामा करून दाखवला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त केली आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका ड्रॉ करणारा तो दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे.

यापूर्वी एमएस धोनीने २०११ मध्ये हा कारनामा केला होता. गेल्या १२ वर्षांत दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ड्रॉ करणारा रोहित हा पहिलाच भारतीय कर्णधार आहे.गेल्या ३१ वर्षांपासून भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत हरवू शकलेला नाही. (Latest sports)

असा कारनामा करणारा ठरला पहिलाच भारतीय कर्णधार..

दक्षिण आफ्रिकेला केपटाऊन पराभूत करणं मुळीच सोपं नाही. गेल्या ३१ वर्षांत कुठलाच भारतीय कर्णधार दक्षिण आफ्रिकेला केपटाऊनमध्ये हरवू शकला नव्हता. रोहित शर्मा असा कारनामा करुन दाखवणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच आशियातील पहिलाच कर्णधार ठरला आहे.

भारतीय संघाचा जोरदार विजय..

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ७९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक २८ धावांची खेळी केली. तर रोहित शर्मा १७ धावांवर नाबाद राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT