Team india X/BCCI
Sports

IND vs SA 2nd Test, Day 2: ७४ ओव्हर्स अन् २३ विकेट्स ; केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी काय घडलं? पाहा सामन्याचे हायलाईट्स

India vs South Africa 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना केपटाऊनच्या मैदानावर सुरू आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa 2nd Test Day 1 Highlights:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना केपटाऊनच्या मैदानावर सुरू आहे. दरम्यान या सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली आहे. पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन वेळा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ ३६ धावांनी पिछाडीवर आहे.

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. कारण दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या ५५ धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ६ तर मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.

भारतीय संघाने केल्या १५३ धावा

दक्षिण आफ्रिकेचा डाव ५५ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला. भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तर रोहित शर्माने ३९ आणि शुभमन गिलने ३६ धावा केल्या. ज्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज अडचणीत सापडले. त्याच खेळपट्टीवर भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करत होते. एकवेळ अशी होती जेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ४ गडी १५३ धावा इतकी होती. मात्र शून्य धावांवर भारताचे ६ फलंदाज माघारी परतले. (Latest sports updates)

दक्षिण आफ्रिकेचा संघ पिछाडीवर..

सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर यावं लागलं आहे. भारतीय संघाचा डाव आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आला आहे. आतापर्यंत या संघाने ३ गडी बाद ६२ धावा केल्या आहेत. हा संघ अजूनही ३६ धावांनी पिछाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT