Team india twitter
Sports

IND vs SA: दुसऱ्या सामन्यासाठी सूर्याचा मास्टरप्लान! या ११ खेळाडूंसह उतरणार मैदानात

India vs South Africa 2nd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या टी -२० सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.

Ankush Dhavre

IND vs SA, Team India Playing XI Prediction: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघामध्ये ४ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव केला. आता मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. मालिकेतील दुसरा सामना आज (१० नोव्हेंबर) गकेबरहामध्ये रंगणार आहे.

दुसऱ्या सामन्यासाठी कशी असेल खेळपट्टी?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावर आतापर्यंत अनेक मोठे स्कोअर पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आज होणारा सामनाही हाय स्कोरिंग असू शकतो. यासह ढगाळ वातावरण असल्यामुळे गोलंदाजांनाही मदत मिळू शकते.

कोण जिंकणार सामना?

मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मायदेशात खेळण्याचा फायदा घेता आला नव्हता. भारताने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या सामन्यात कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. त्यामुळेच दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळेल.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघ- संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई/यश दयाल, वरुण चक्रवर्ती, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका- रिजा हेंड्रिक्स, रियान रिकेल्टन, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, गेराल्ड कोएत्ज़ी, नकाबायोमज़ी पीटर आणि ओटनील बार्टमन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT