dean elgar twitter
Sports

IND vs SA,1st Test Day 3: डीन एल्गरचं दुहेरी शतक हुकलं! पहिल्या सेशननंतर दक्षिण आफ्रिकेची टीम इंडियावर मोठी आघाडी

India vs South Africa 1st Test Day 3 LIVE: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे.

Ankush Dhavre

India vs South Africa, 1st Test Day 3 1st Session:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. सेंच्युरियनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघ पूर्णपणे बॅकफूटवर असल्याचं दिसून आलं आहे. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या डावाच्या समाप्तीपर्यंत दक्षिण आफ्रिकेने १४७ धावांची आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजी करण्यासाठी आला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेकडे अवघ्या ११ धावांची आघाडी होती. मात्र डीन एल्गर आणि यान्सेनने १११ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. या भागीदारीमुळे भारतीय संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला.

डीन एल्गरचं दुहेरी शतक हुकलं

आपली शेवटची कसोटी मालिका खेळत असलेला डीन एल्गर दक्षिण आफ्रिकेसाठी संकटमोचक ठरला आहे. त्याने सामन्याच्या दिवशी आपलं शतक पूर्ण केलं. तर तिसऱ्या दिवशी त्याची दुहेरी शतकाच्या दिशेने वाटचाल सुरू होती. मात्र २८७ चेंडूत तो १८५ धावा करत माघारी परतला. त्याचं दुहेरी शतक अवघ्या १५ धावांनी हुकलं आहे. डीन एल्गरचं दुहेरी शतक हुकलं असलं तरीदेखील मार्को यान्सेन अजुनही खेळपट्टीवर टीकून आहे. त्याने १२० चेंडूत ७७ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

भारतीय संघाने केल्या २४५ धावा

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. केएल राहुल वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली ३८ तर शार्दुल ठाकूर २४ धावा करत माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT