durban twitter
Sports

IND vs SA 1st T20I: पहिला टी-२० सामना पावसामुळे धुतला जाणार? वाचा लेटेस्ट अपडेट

India vs South Africa 1st T2OI Weather Update: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो. वाचा लेटेस्ट अपडेट.

Ankush Dhavre

India vs South Africa 1st T20I Weather Update: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ४ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (८ नोव्हेंबर) डरबनमध्ये रंगणार आहे. एकीकडे भारतीय संघ बांगलादेशला टी-२० मालिकेत ३-० ने पराभूत करुन आला आहे.

तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी दोन्ही संघांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

भारत- दक्षिण आफ्रिका सामन्यात पावसाची बॅटिंग?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना डरबनमध्ये रंगणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता, तर भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरु होईल.

दरम्यान सामन्यावेळी पाऊस पडण्याची शक्यता ही ४६ टक्के इतकी असणार आहे. तर रात्री ९ च्या दरम्यान ही शक्यता ५० च्या पुढे जाईल. त्यामुळे या सामन्यादरम्यान पावसाची बॅटिंग पाहायला मिळू शकते. त्यामुळे सामना रद्द होण्याचीही शक्यता आहे.

डरबनमध्ये कसा राहिलाय रेकॉर्ड?

डरबनच्या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर या मैदानावर आतापर्यंत २२ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान केवळ २ सामने पावसामुळे धुतले गेले आहेत. तर ११ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे. तर ९ सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांनी जिंकले आहेत.

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

दक्षिण आफ्रिका - एडेन मार्करम, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्जी, डोनोवन फरेरा, रिजा हेंड्रिक्स, मार्को जानसेन, हेनरिक क्लासेन, पेट्रिक क्रूगर, केशव महाराज,नकाबा पीटर, रयान रिकेलटन, एंडिल सिमलेन, लूथो सिपाम्ला, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना

भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, आवेश खान ,यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Vastu For Money: धनवाढीसाठी घरात ठेवा 'या' ७ चमत्कारी वस्तू

SCROLL FOR NEXT