Smriti Mandhana Saam Tv
Sports

World Cup: पाकिस्तानच्या गाेलंदाजांचा स्मृती मानधनाने घेतला समाचार; ठाेकले अर्धशतक

यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत ८ संघांमध्ये २७ सामने खेळवण्यात येणार आहेत. यानंतर गुणपत्रकानुसार, ४ संघांमध्ये उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत.

साम न्यूज नेटवर्क

माऊंट मौनगानुई : महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील (World Cup 2022) आज पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करीत आहे. सलामीस आलेल्या स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने अर्धशतकी खेळी करीत संघाचा धावफलक उंचावत ठेवला आहे. (India Pakistan World Cup Match Latest Updates)

कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसर्‍या षटकात भारतीय संघाची नवाेदित खेळाडू शफाली वर्मा शून्यावर बाद झाली. यामुळे भारतीयांची सुरुवात खराब झाली असेच म्हणावे लागेल. त्यानंतर स्मृती मानधनाने डाव सावरला.

दहा षटकांनंतर भारतीय संघाने सामन्यात शानदार पुनरागमन केले. स्मृती मानधनाने संयमी खेळी करीत तिचे एकदिवसीय सामन्यातील २१ वे अर्धशतक पुर्ण केले. तिला दिप्ती शर्माने उत्तम साथ दिली. दरम्यान २४ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर बी.एन.अमिनच्या गाेलंदाजीवर स्मृती मानधना ५२ (७५) झेल बाद झाली. त्यावेळी भारतीय संघाचा धाव फलक ९८ असा हाेता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत पुलावर लटकून तरुणाचा गोंधळ; नागरिकांच्या धाडसामुळे टळली दुर्घटना

Dombivli Water Cut : डोंबिवलीत सलग ३६ तास पाणी बंद; MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक

Martyred Policemen: शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार २ कोटींची मदत, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Daler Mehndi: 'गायक दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आले'; त्या व्हायरल व्हिडिओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

ZP Election : दसऱ्यानंतर भाजपचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसच्या बालेकिल्यात ४० जणांनी हातात धरलं कमळ

SCROLL FOR NEXT