ind vs pak saam tv
Sports

India vs Pakistan Match Date: ठरलं! तर 'या' दिवशी रंगणार भारत - पाकिस्तान सामन्याचा थरार; पाहा अपडेटेड वेळापत्रक

ODI World Cup 2023: भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

Ankush Dhavre

India vs Pakistan Match Date in ICC Cricket World Cup 2023: भारतात यावर्षी वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ १५ ऑक्टोबर रोजी आमने सामने येणार आहेत. मात्र या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता हा सामना १४ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

का बदलली गेली भारत - पाकिस्तान सामन्याची तारीख?

काही दिवसांपूर्वीच वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार बहुप्रतिक्षित भारत - पाकिस्तान सामना १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार होता. मात्र या तारखेत आता बदल करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे. या दिवशी अहमदाबादमध्ये जल्लोषाचे वातावरण असेल. तसेच प्रचंड गर्दी देखील असेल. सुरक्षेच्या दृष्टीने या सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. सामन्याच्या तारखेत बदल केला गेला असला तरीदेखील सामन्याचे ठिकाण तेच असणार आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. तर वर्ल्डकप स्पर्धेचा पहिला सामना गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. तर स्पर्धेतील अंतिम सामना देखील याच मैदानावर रंगणार आहे. हा सामना १९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT