suryakumar yadav 
Sports

पाकिस्तानविरोधात भिडण्याआधी सूर्यादादाचे टेन्शन वाढलं, हार्दिकसह हुकमी एक्का दुखापतग्रस्त

Abhishek Sharma Hardik Pandya injury update : आशिया कप फायनलपूर्वी भारताला मोठा धक्का! हार्दिक पांड्या आणि अभिषेक शर्मा दुखापतग्रस्त. फिटनेस टेस्टनंतरच पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही यावर निर्णय होणार.

Namdeo Kumbhar

Abhishek Sharma Hardik Pandya injury update before India vs Pakistan match : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काटें की टक्कर होणार आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात दोन हात करण्याआधी भारतासाठी एक धक्कादायक अन् चिंताजनक घटना घडली आहे. स्टार ऑलराऊंड हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला आहे. त्याशिवाय अभिषेक शर्मा यालाही दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अभिषेक शर्माने आशिया चषकात भारताकडून सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. प्रत्येक सामन्यात अभिषेकने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. अशामध्येच अभिषेकच्या दुखापत समोर आल्याने भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. हार्दिक पांड्यामुळे टीम इंडियाला संतुलन मिळते. हाणामारीच्या षटकात हार्दिक पांड्याची बॅट चालतेय, त्याशिवाय वेगवान गोलंदाजाही करतो. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि अभिषेक यांच्या दुखापतीने भारताचे टेन्शन वाढलं.

आशिया कपच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याने फक्त एक षटक टाकून मैदान सोडलं. स्टार सलामीवीर अभिषेक शर्माही शुक्रवारी मैदानात अस्वस्थ दिसत होता. पंड्याने श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिसला बाद करून भारताला चांगली सुरूवात दिली. पण त्याने एका षटकानंतर मैदान सोडलं. हार्दिक पांड्या मांडीला धरून मैदानाबाहेर निघून गेला. त्यानंतर तो सामन्यात परतला नाही. त्यामुळे भारतीय संघ अन् सूर्यकुमार यादव यांचं टेन्शन वाढले आहे.

दुबईतील दमट वातावरणामुळे हार्दिक पंड्याला दुखापत झाली. त्याची दुखापत गंभीर नसून सध्या तो सावरत आहे. विश्रांतीनंतर पुन्हा तो खेळण्यासाठी तयार होईल, असे भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल याने सांगितले. शनिवारी फिटनेस टेस्टनंतरच हार्दिक पांड्या अंतिम सामन्यात खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असेही तो म्हणाला.

अभिषेक शर्मा अस्वस्थ

आशिया चषक स्पर्धेत अभिषेक शर्माने सर्वाधिक धावा, षटकार ठोकले आहेत. श्रीलंकाविरोधात अर्धशतक ठोकत त्याने ३०० धावांचा पल्ला ओलांडला होता. श्रीलंकेविरोधात फिल्डिंग करताना अभिषेक शर्मालाही क्रॅम्पचा त्रास झाला. त्यामुळे त्याने मैदान सोडले होते. हार्दिक पांड्या आणि अभिषेक शर्मा यांना क्रॅम्पचा त्रास झाला. दोघांबाबात आज निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, शनिवारी भारतीय संघ सराव करणार नाही. खेळाडूंना विश्रांतीची गरज असल्याचे मॉर्केल याने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT