Ind vs Pak Saam Tv
Sports

असं काय झालं पाकिस्तान विरुद्ध सामन्यात कर्णधार रोहित शर्मा जाम भडकला, जाणून घ्या (Video)

आशिया चषक 2022 च्या सुपर-4 मध्ये, पाकिस्तानने रोमहर्षक सामन्यात भारताचा 5 गडी राखून पराभव केला.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : आशिया चषक 2022 च्या सुपर-4 मध्ये, पाकिस्तानने रोमहर्षक सामन्यात भारताचा 5 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने (Team India) पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले. सलामीवीर मोहम्मद रिझवान 71 धावा आणि मोहम्मद नवाज 42 या धावांच्या जोरावर टीम पाकिस्ताने टीम इंडियाचा पराभव केला. पण या सामन्यात टर्निंग पॉइंट आला होता. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कामगिरी केली होती, अर्शदीप सिंगने एक झेल सोडल्याने सामन्याची दिशा बदलली. अर्शदीपने झेल सोडल्यानंतर कर्णधार रोहित शर्माही जोरदार भडकल्याचे पाहायला मिळाले. सध्या रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानच्या डावात 17व्या षटकात हार्दिक पंड्याने मोहम्मद रिझवानला बाद करून टीम इंडियाच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी आता 19 चेंडूत 36 धावांची गरज होती. लेगस्पिनर रवी बिश्नोई भारताकडून (Team India) १८ वे षटक टाकण्यासाठी आला. बिश्नोईच्या या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आसिफने मोठा शॉट लगावला. पण शॉर्ट थर्ड मॅनवर अर्शदीपने सोपा झेल सोडला. हे पाहून कर्णधार रोहित शर्मा चांगलाच भडकला.

यानंतर आसिफ अलीने 8 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 16 धावांची खेळी केली आणि सामना टीम इंडियाच्या हातून बाहेर गेला. आसिफ अलीने खुशदिल शाह (14) सोबत 17 चेंडूत 33 धावांची भागीदारी केली.

आशिया चषकात टीम इंडियाचा (Team India) पहिला पराभव झाला. टूर्नामेंटच्या सुपर-4 च्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. याआधी ग्रुप फेरीत भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात पहिल्यांदा खेळताना भारताने 7 बाद 181 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने 60 धावा केल्या.

यानंतर पाकिस्तानने (Pakistan) 19.5 षटकांत 5 गडी राखून सामना जिंकला. मोहम्मद रिझवानने 71 धावा केल्या. याशिवाय मोहम्मद नवाजनेही 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सुपर-4 च्या 4 पैकी फक्त 2 संघ अंतिम फेरीत जाऊ शकणार आहेत. सुपर-4 मध्ये प्रत्येक संघाला 3-3 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे आता या पराभवानंतर टीम इंडियाचे अंतिम फेरी गाठण्याचे समीकरण कसे असणार आहे ते आपण पाहणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: चालत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; युवती जखमी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT