ind vs nz twitter
Sports

IND vs NZ, 3rd Test: भारतीय गोलंदाज चमकले, पण फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी ४ फलंदाज तंबूत

India vs New Zealand 3rd Test Day 1 Highlights: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा थरार मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे.

Ankush Dhavre

न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

त्यामुळे व्हॉईटवॉशपासून वाचण्यासाठी भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. आज भारताचे ४ गडी बाद झाले असून ८६ धावा झाल्या आहेत. यामुळे न्यूझीलंडकडे १४९ धावांची आघाडी आहे.

न्यूझीलंडचा डाव २३५ वर आटोपला

न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना,सलामीला आलेल्या टॉम लेथमने २८, डेवॉन कॉनव्हेने ४, रचिन रविंद्रने ५ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून विल यंगने शानदार फलंदाजी करत ७१ धावांची खेळी केली. तर डॅरील मिशेलने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली. मात्र न्यूझीलंडचा डाव अवघ्या २३५ धावांवर आटोपला.

भारतीय संघाला ४ मोठे धक्के

गोलंदाजीत दमदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाला पहिल्याच दिवशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र भारतीय संघाला एका पाठोपाठ एक ४ धक्के बसले. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी सलामीला आली. रोहित अवघ्या १८ धावा करत माघारी परतला. त्यानंतर जयस्वाल आणि गिलने डाव सावरला. मात्र जयस्वाल ३० धावांवर माघारी परतला. त्यानंतर मोहम्मद सिराज शून्यावर आणि विराट कोहली ४ धावांवर माघारी परतला.

भारतीय गोलंदाज चमकले

वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भरातीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. सुरुवातीला आकाश दीपने विकेट घेत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर ४ आणि रविंद्र जडेजाने ५ गडी बाद केले. जडेजाने या डावात गोलंदाजी करताना २ वेळेस एकाच षटकात २ गडी बाद करण्याचा कारनामा केला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

न्यूझीलंड - टॉम लेथम (कर्णधार), डेवोन कॉनव्हे, विल यंग, रचिन रविंद्र, डेरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, इश सोढी, मॅट हेनरी, एजाज पटेल, विल्यम ओ’रुर्क.

भारत: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, याचा गैरसमज आम्ही #@$ डू नाही - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT