IND vs NS Toss twitter
Sports

IND vs NS Toss: कोणाचा विजयरथ थांबणार? महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाने जिंकला टॉस; 2 बदलांसह उतरणार मैदानात

India vs New Zealand Toss Update: महत्वाच्या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकला आहे.

Ankush Dhavre

India vs New Zealand Toss Update:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत सुपर संडेचा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना धरमशाळेतील हिमाचल क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल. या सामन्यापूर्वी नाणेफेक झाली. ही नाणेफेक भारतीय संघाने जिंकली असून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. बांगलादेशविरूद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी करत असताना हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो या सामन्यात खेळताना दिसू्न येणार नाही. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवला संघात स्थान दिलं गेलं आहे. तर शार्दुल ठाकुरला विश्रांती देऊन मोहम्मद शमीला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं आहे.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

या सामन्यासाठी अशी आहे न्यूझीलंडची प्लेइंग ११:

डेवॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रविंद्र, डॅरिल मिशेल, टॉम लेथम (कर्णधार,यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सॅन्टनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट (Latest sports updates)

असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड..

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला तर हे दोन्ही संघ आतापर्यंत ९ वेळेस आमने सामने आले आहेत. यापैकी ५ सामन्यांमध्ये न्यूझीलंडने बाजी मारली आहे. तर केवळ ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singer Death : जादुई आवाज हरपला! प्रसिद्ध गायकाचे निधन, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: "बापट जाऊ द्या ना", अखेर विद्यानंद बापट यांच्यावर रॅप साँग प्रदर्शित

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! रिक्षा आणि पिकअपची जोरदार धडक, ३ जणांचा जागीच मृत्यू; ५ जण गंभीर

शहरात राहणाऱ्या नोकरदारांची लॉटरी! केंद्र सरकारची मोठी घोषणा; घरांसाठी सुरू केली 'ही' योजना

Traffic News: घोडबंदर रोडवरची वाहतूक कोंडी कमी होणार; गायमुख-पायेगाव खाडी पुलाच्या पायलिंगचं ९५ टक्के काम पूर्ण

SCROLL FOR NEXT