India vs New Zealand 2nd T20I match result 2026 
Sports

India vs New Zealand: तिलक-नीतीश आणि नमनच्या तिकडीनं फिरवला डाव; न्युझीलंडच्या तोंडचा घास हिरावला,टीम इंडियाची २-०ने आघाडी

India vs New Zealand, 2nd T20I : न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत दुसरा सामना ४ गडी राखून जिंकत भारतीय संघानं जिंकलाय. भारतीय संघाने २-० अशी आघाडी घेतलीय. या सामन्यात नमन, तिलक आणि नितीश या त्रिकुटाने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Bharat Jadhav

न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना ख्राइस्टचर्चच्या स्टेडियमवर खेळला गेला. यात भारतीय संघाने ४ गडी राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीय. या सामन्यात भारतीय संघासमोर १८१ धावांचे लक्ष्य होते. मात्र धावांचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या ७० असताना पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते.

यानंतर, तिलक वर्मा नमन धीर आणि नितीश कुमार रेड्डी या त्रिकुटाने फलंदाजीमध्ये दमदार कामगिरी करत भारतीय संघाला एक रोमांचक विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तिलक वर्माने नाबाद ५१ धावांची उत्कृष्ट खेळी केली, तर नितीश कुमार रेड्डीनेही महत्त्वाच्या टप्प्यावर नाबाद २६ धावांचे योगदान दिले आणि संघाला विजय मिळवून दिला.

धावसंख्या ७० वर निम्मे खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघासमोर १८१ धावांचे लक्ष्य होते. याचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. संजू सॅमसन १४ धावांवर असताना तो बाद झाला. त्यानंतर मात्र भारतीय संघाच्या फलंदाजांची घसरगुंडी सुरू झाली. संजू बाद झाल्यानंतर एकामागून एक विकेट पडत गेल्या. वैभव सूर्यवंशी (४ धावा), अभिषेक शर्मा (२७ धावा), कर्णधार अय्यर (७ धावा) आणि अक्षर पटेल (केवळ ११ धावांवर बाद झाला. अवघ्या ७० धावांमध्ये भारतीय संघाचे निम्मे खेळाडू तंबूत परतले होते. या सामन्यात न्यूझीलंडचे पूर्ण वर्चस्व दिसून आले.

तिलक नमन आणि नितीशनं सामना फिरवला

संघाच्या ७० धावांत ५ गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्य टी२० सामन्यात भारतीय संघाचा पराभव होईल असं वाटत होतं. त्याचवेळी संघातील तिलक, नमन आणि नितीशच्या तिकडीनं कमाल करत डाव सावरला. सहाव्या विकेटसाठी या दोघांनी अवघ्या २४ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी केली, ज्याने भारतीय संघाला पुन्हा सामन्यात परत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नमन धीरने १७ चेंडूंत ३१ धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी साकारली, त्यानंतर तो बाद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farm Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीच्या चौथ्या यादीत कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ?

Medicine Safety : मुदत संपलेली औषधं घेताय? आरोग्यासाठी ठरू शकतं अत्यंत धोकादायक

Maharashtra News Live Update: टोरंट पावर कंपनींसाठी ३२ हजार झाडांवर कुऱ्हाड

Dengue Prevention Tips: डेंग्यूच्या विळख्यापासून राहायचे असेल दूर, तर अजिबात चुकू नका 'या' ५ महत्त्वाच्या टिप्स

Skin Care: नॅचरल ग्लो हवा? महागड्या ट्रीटमेंटऐवजी करून पाहा हा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT