Ind Vs NZ 2nd ODI Saamtv
Sports

Ind vs NZ ODI Series: गोलंदाजांनी गाजवला दिवस! अवघ्या १०८ धावांत न्यूझीलंडला गुंडाळले, शमी- सिराजचा भेदक मारा

भारतीय संघाने भेदक मारा करताना अवघ्या 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडलं आहे. ज्यामुळे आता केवळ 109 धावांचे माफक लक्ष्य गाठून भारताला सामना जिंकता येणार आहे.

Gangappa Pujari

Ind Vs NZ 2nd ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपुरच्या वीर नारायण सिंग मैदानावर खेळला जात आहे. भारतीय संघाने भेदक मारा करताना अवघ्या 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडलं आहे. ज्यामुळे आता केवळ 109 धावांचे माफक लक्ष्य गाठून भारताला सामना जिंकता येणार आहे. हा सामना जिंकून भारत मालिकाही 2-0 ने विजयी आघाडी घेत खिशात घालू शकतो.

भारताच्या सर्वच गोलंदाजांनी आज अप्रतिम कामगिरी केली. यावेळी मोहम्मद शमी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक झटके देत डाव संपुष्टात आणला.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरूवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात भारतीय संघ वर्चस्व गाजवताना दिसला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने किवी सलामवीर फिन ऍलनला क्लीन बोल्ड केले.

स्टार वेगवान गोलंदाज हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) 15 धावांवर न्यूझीलंड संघाला चौथा धक्का दिला. पंड्याने डेव्हॉन कॉनवेला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. कॉनवेने 16 चेंडूत 7 धावा केल्या.

रायपूर एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली सर्वच गोलंदाजांनी न्यूझीलंडचे अक्षरशः कंबरडे मोडले. या सामन्यात मोहम्मद शमीने तीन, तर वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्याने 2-2 विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून जी ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३६ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT