ind vs NZ ODI  
Sports

Ind vs NZ ODI Series: शानदार,जबरदस्त, जिंदाबाद! दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा दणदणीत विजय, मालिका खिशात

या विजयासोबतच भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली आहे.

Gangappa Pujari

Ind Vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील दुसरा एकदिवसीय सामना रायपुरच्या वीर नारायण सिंग मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला. या विजयासोबतच भारतीय संघाने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली आहे. (Indian Cricket Team)

या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 109 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 20.1 षटकात 2 विकेट्स गमावत 111 धावा करत विजय निश्चित केला.

भारताच्या सर्वच गोलंदाजांनी आज अप्रतिम कामगिरी केली. यावेळी मोहम्मद शमी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना एकापाठोपाठ एक झटके देत डाव संपुष्टात आणला. त्यामुळे भारतीय गोलंदाज या सामन्याचे शिल्पकार ठरले.

सामन्यात मोहम्मद शमीने तीन, तर वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्याने 2-2 विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून जी ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३६ धावा केल्या.

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाची सुरूवात अत्यंत खराब झाली.भारतीय संघाने भेदक मारा करताना अवघ्या 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडलं. सामन्यात मोहम्मद शमीने तीन, तर वॉशिंग्टन सुंदर आणि हार्दिक पांड्याने 2-2 विकेट घेतल्या. न्यूझीलंडकडून जी ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३६ धावा केल्या.  

रोहित शर्माचे अर्धशतक:

109 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला कर्णधार रोहित (Rohit Sharma) आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 72 धावांची भागीदारी झाली. रोहितने 50 चेंडूत 51 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. रोहित पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कोहली गिलला साथ देण्यासाठी मैदानात आला, पण तो संघाला विजयाचा उंबरठा ओलांडू शकला नाही आणि 11 धावा करून परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT