jonny bairstow virat kohli India vs England Test Latest News SAAM TV
Sports

Ind vs Eng : विराट कोहली-बेयरस्टो मैदानातच भिडले; आता भांडणाचं खरं कारण आलं समोर

विराट कोहली आणि जॉनी बेयरस्टो यांच्यात असं काय घडलं की ते मैदानातच भिडले?

Nandkumar Joshi

बर्मिंगहॅम: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात एजबेस्टन येथे पाचवा कसोटी सामना सुरू आहे. हा कसोटी सामना अत्यंत चुरशीचा होत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टो यांच्यात भर मैदानातच जुंपली. दोघांमध्ये बाचाबाची झाली. पंचांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. या भांडणामागील कारण आता समोर आलं आहे. (India vs England Test jonny bairstow-virat kohli News)

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया (Team India) यांच्यातील पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जॉनी बेयरस्टो याने या वादामागचं कारण सांगितलं. त्यानं हसत हसत प्रतिक्रिया दिली. कोहलीला डिनरला बोलावण्यास नकार दिला होता. त्यामुळे विराट कोहली (Virat Kohli) नाराज झाला होता, असं बेयरस्टो यानं सांगितलं.

'तोंड बंद कर आणि बॅटिंग कर'

इंग्लंड आणि टीम इंडिया (India vs England) यांच्यातील कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळाने विराट कोहली-बेयरस्टो यांच्यात वाद रंगला. मोहम्मद शामीच्या ओव्हरमध्ये एका चेंडूवर बेयरस्टो बीट झाला. त्यानंतर स्लिपला उभा असलेला विराट कोहली काहीतरी बोलला. त्यावर बेयरस्टोने त्याला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर कोहलीही पुढे आला. दोघांमध्ये बराच वेळ बाचाबाची सुरू होती. स्टम्पजवळ असलेल्या माइकमध्ये त्यांच्यातला संवाद ऐकू आला. काय करायचं आहे ते तू मला नको सांगू, तुझं तोंड बंद कर आणि बॅटिंग कर, असं कोहली म्हणाला.

कोहली आणि बेयरस्टो यांच्यात बाचाबाची सुरू असताना, पंच तेथे आले. त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रय़त्न केला. दोन्ही पंचांनी या दोघांना शांत राहण्यास सांगितलं. त्यानंतर वातावरण निवळलं. पण मोहम्मद शामीची ओव्हर संपल्यानंतर विराट कोहली आणि बेयरस्टो यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांशी हसताना दिसले.

बेयरस्टो म्हणाला, डिनरला बोलवण्यास नकार दिल्याने कोहली नाराज

याबाबत प्रतिक्रिया देताना बेयरस्टो याने हसत हसत या वादामागील कारण सांगितलं. विराटला डिनरला बोलावण्यास नकार दिला होता. आमच्यात खरंच काही झालं नाही. आम्ही दोघे जवळपास १० वर्षांपासून एकमेकांविरोधात खेळत आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र डिनरला दिसू, असा मला विश्वास आहे. त्यामुळे याबाबत चिंता करण्याचं कारण नाही, असंही बेयरस्टो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT