India Vs England 1st ODI Rohit Sharma and Virat Kohli SAAM TV
Sports

India Vs England 1st ODI | भारत-इंग्लंड वनडेत आमनेसामने; कुठे आणि कधी पाहाल मॅच?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिली वनडे उद्या मंगळवारी होणार आहे. सगळ्यांच्या नजरा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असतील.

Nandkumar Joshi

मुंबई: भारतानं इंग्लंडविरुद्ध टी 20 मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचं लक्ष इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेवर लागलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिली लढत मंगळवारी होत आहे. (India vs England 1st One day Match See details Live Streaming Update)

टीम इंडियानं (Team India) आपला आक्रमकपणा कायम ठेवायला हवा, असं कर्णधार रोहित शर्माला वाटतं. शिखर धवनसाठी ही मालिका महत्वाची असेल. सध्या शिखर धवन हा केवळ वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व करत आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी त्याला कर्णधार करण्यात आले आहे.

भारतानं इंग्लंडविरोधात (India vs England) टी-20 मालिका जिंकली असली तरी, आता पुन्हा एकदा विराट कोहलीच्या कामगिरीवर सगळ्यांच्या नजरा असतील. विराट बऱ्याच काळापासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांत तो सपशेल अपयशी ठरला. फलंदाजीसह क्षेत्ररक्षणामुळंही त्याला टीकेला सामोरे जावे लागले. आता वनडे मालिकेत त्याच्यावर प्रचंड दबाव असणार आहे. वनडेमध्ये पुन्हा फॉर्मात येण्यासाठी त्याला थोडा वेळ मिळणार आहे. तर दुसरीकडे जॉस बटलर याची कर्णधार म्हणून ही पहिली वनडे सीरीज आहे.

India vs England पहिला वनडे सामना कुठे आणि कधी ?

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला सामना द ओव्हलमध्ये खेळवला जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना 12 जुलै रोजी होणार आहे.

भारत वि. इंग्लंड यांच्यातील पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होईल.

तर लाइव्ह सोनी नेटवर्कच्या चॅनल्सवर दिसेल. हिंदी भाषेत सोनी टेन 3 वर बघू शकता. सोनी सिक्सवरही हा सामना पाहता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT