India vs Bangladesh Match Weather Update Saam tv
Sports

IND vs BAN, Asia Cup 2023: भारत -बांगलादेश सामना रद्द होणार? समोर आलं मोठं कारण

India vs Bangladesh Match Weather Update: हा सामना रद्द होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh Weather Update:

आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. भारत आणि श्रीलंकेने आशिया चषकाच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

या सामन्याचा गुणतालिकेवर कुठलाही परिणाम होणार नाही. मात्र भारतीय संघ हा सामना जिंकून विजयाची हॅट्रीक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

तर बांगलादेशचा संघ हा सामना जिंकून गोड शेवट करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जाणून घ्या कसे असेल कोलंबोतील हवामान.

असे असेल हवामान..

भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यात होणारा हा सामना कोंलबोतील प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. Accuweather च्या अहवालानूसार भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या सामन्यातील काही तास पावसामुळे धुतले जाऊ शकतात.

सामन्यावेळी पाऊस पडण्याचा अंदाज ८८ टक्के इतका असणार आहे. संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता अधिक असणार आहे. त्यामुळे सामना काही वेळ थांबवला जाऊ शकतो.

भारत-श्रीलंकेत रंगणार अंतिम सामना..

पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना रंगला. हा सामना दोन्ही संघांसाठी सेमीफायनलचा सामना होता. कारण हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत जाण्याची संधी होती.

या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारत विरूद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये १७ सप्टेंबर रोजी स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. (Latest sports updates)

बांगलादेशविरूद्ध होणाऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली/सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर/केएल राहुल, ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी/जसप्रीत बुमराह .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT