IND vs AUS: Saam tv
Sports

IND vs AUS: 'सूर्य'कुमारच्या यंगीस्थानची कमाल; टीम इंडियाने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला केलं पराभूत, मालिकाही जिंकली

India vs Australia 4th T20 Match: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच टी-२० सामन्याची मालिका सुरु आहे. या मालिकेच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. इंडियाने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे.

Vishal Gangurde

India vs Australia 4th T20 Match:

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाच टी-२० सामन्याची मालिका सुरु आहे. या मालिकेच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. टीम इंडियाने मालिकेतील चौथा सामना जिंकत मालिका जिंकली. (Latest Marathi News)

'सूर्य'कुमारच्या यंगीस्थानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडियाने या ३-१ ने मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने टी-२० मालिकेच्या चौथ्या सामन्यात २० षटकात ९ गडी गमावून १७४ धावा केल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया फक्त २० षटकात ७ गडी गमावून १५४ धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाने २० धावांनी सामना जिंकला. टीम इंडियासाठी अक्षर पटेलने तीन गडी बाद केले. तर दीपक चहरने २ गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाने केली चांगली सुरुवात

टीम इंडियाने दिलेल्या १७५ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. ट्रेव्हिस हेड आणि जोशने चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी रचली.

अन् टीम इंडिया २० धावांनी जिंकली

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का जोशच्या रुपात बसला.जोशने ७ चेंडूत ८ धावा करून बाद झाला. काही वेळेनंतर हेडही तंबूत परतला. हेडने १६ चेंडूत ३१ धावा केल्या. त्यानंतर हार्डीला अक्षरने बोल्ड केले. तर बेन फक्त १९ धावा करू शकला. टिम डेव्हिडने २० चेंडूत १९ धावा करून तंबूत परतला. मॅथ्यू शॉर्ट १९ चेंडूत २२ धावा करून बाद झाला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यूने २३ चेंडूत ३६ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात ३१ धावा हव्या होत्या, मात्र त्यांनी १० धावा केल्या. यामुळे टीम इंडिया २० धावांनी जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT