ind vs aus twitter
Sports

IND vs AUS: भारताचा टॉप ऑर्डर कोसळला; ऑस्ट्रेलियाची विजयाकडे वाटचाल; टीम इंडियाचा चान्स केवळ 0.5%

India vs Australia 3rd Test, Day 3 Highlights: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामनात ब्रिस्बेनच्या गाबामध्ये सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाचा खेळ पाहायला मिळाला.

पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नाही, तर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव फसला. पावसामुळे भारतीय फलंदाजांची ये जा सुरुच राहिली.

तिसऱ्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात ४ गडी बाद ५१ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे अजूनही ३९४ धावांची आघाडी आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४४५ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आली. भारताला दुसऱ्याच चेंडूवर मोठा धक्का बसला.

यशस्वी जयस्वाल अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. त्यानंतर शुभमन गिलनेही पॅव्हेलियनची वाट धरली. गेल्या सामन्यात फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो अवघ्या ३ धावा करत माघारी परतला.

गाबा कसोटीचा हिरो ठरलेला रिषभ पंत अवघ्या ९ धावा करत माघारी परतला. केएल राहुल आणि रोहित शर्मा अजूनही मैदानावर आहेत. या दोघांवरही संघाला मजबूत स्थितीत पोहचवण्याची जबाबदारी असणार आहे.

ऑस्ट्रेलियाने केल्या ४४५ धावा

रोहित शर्माने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथण फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना ट्रेविस हेडने सर्वाधिक १५२ धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने १०१ धावा केल्या. शेवटी फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीने ७० धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४४५ धावांपर्यंत बाजी मारली.

भारताकडून बुमराह चमकला

या सामन्यातही जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली आहे. या डावात गोलंदाजी करताना त्याने २८ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ७६ धावा खर्च करत ९ मेडन ओव्हर टाकले आणि ६ गडी बाद केले. तर मोहम्मद सिराजने २ गडी बाद केले. तर नितीश कुमार रेड्डी आणि आकाश दीपने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parth Pawar Pune Land Scam Case: पुण्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटीत, पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप

Face Care: नॅचरल ग्लोईंग स्किनसाठी लावा 2 मिनटात तयार होणारा 'हा' हॉममेड फेस मास्क

Women’s World Cup 2025: महिला वर्ल्ड कप विजेत्या टीमला टाटा मोटर्सकडून मोठ्ठं गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार नवी Tata Sierra SUV

Maharashtra Live News Update: फलटण प्रकरणात तिसरा मोठा दणका, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली

Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, फास्ट लोकलने उडवल्याने तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT