team india twitter
Sports

IND vs AUS 2nd Test: भारत- ऑस्ट्रेलिया दुसरा सामना केव्हा, कुठे अन् किती वाजता पाहता येणार?

India vs Australia 2nd Test, Match Details: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना केव्हा आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर - गावसकर मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी बाजी मारली.

मालिकेतील पहिल्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवल्यानंतर मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान हा सामना केव्हा, कुठे आणि किती वाजता पाहता येणार? जाणून घ्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना कुठे रंगणार आहे?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा दुसरा कसोटी सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे.

केव्हा सुरु होणार दुसरा सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना ६ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता सुरु होईल. तर नाणेफेक सकाळी ९ वाजता होईल. हा डे- नाईट कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

कुठे लाईव्ह पाहता येणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. हे सामने तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत, केएल राहुल, नीतीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हर्षित राणा.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, देवदत्त पडीक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.


राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT