इंदुरच्या मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या वनडे सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला आहे. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरने शतकी खेळी केल्याचं पाहायला मिळालं आहे. (Shubman Gill Century)
अय्यर- गिलचं शतक..
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. त्यानंतर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरला. (Shreyas Iyer Century)
भारतीय संघाकडून शुबमन गिलने ९२ चेंडूचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र १०४ धावांवर त्याला माघारी परताव लागलं. तर श्रेयस अय्यरच्या खेळीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ८६ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले आहे. अय्यर देखील ५ धावा करत माघारी परतला. (Latest sports updates)
द्विशतकी भागीदारी..
या सामन्यात शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या श्रेयस अय्यरने फलंदाजीला येताच आक्रमण करायला सुरूवात केली. या दोघांमध्ये २०० धावांची भागीदारी केली.
या सामन्यासाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ:
डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन
या सामन्यासाठी असा आहे भारताचा संघ:
शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.