rohit sharma  saam tv news
Sports

IND vs AFG 3rd T20I: भारत- अफगाणिस्तान अंतिम सामना रद्द होणार? वाचा काय आहे कारण?

India vs Afghanistan 3rd T20I Weather Update: भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ येत्या १७ जानेवारी रोजी आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

IND vs AFG Weather Report:

भारतीय संघाने इंदूर कसोटीत अफगाणिस्तानचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. यासह भारतीय संघाने या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा टी -२० सामना १७ जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? जाणून घ्या.

भारत - अफगाणिस्तान तिसरा टी -२० सामना रद्द होणार?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या सामन्यादरम्यान तापमान २७ डिग्री सेल्सिअस इतकं असेल. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे या सामन्यादरम्यान पाऊस पडणार नाही. त्यामुळे चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार वातावरण ढगाळ असेल मात्र पाऊस पडणार नाही. (Latest sports updates)

इंदूर टी-२० सामन्यात भारतीय संघाचा जोरदार विजय...

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी -२० सामना इंदूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटक अखेर १७२ धावा केल्या.

हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला १७३ धावा करायच्या होत्या. भारतीय संघाकडून धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल चमकला. त्याने ३४ चेंडूत सर्वाधिक ६८ धावांची खेळी केली. त्याला साथ देत शिवम दुबेने ३२ चेंडूत ६३ धावा चोपल्या. त्याने फलंदाजी तर केलीच यासह गोलंदाजीतही विकेट्स काढून दिल्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT