virat kohli twitter
Sports

IND VS AUS: चौथा दिवसही भारतीय फलंदाजांनीच गाजवला! ५७१ धावांचा डोंगर उभारत टीम इंडियाने घेतली ८८ धावांची आघाडी

Ankush Dhavre

IND VS AUS 4th test DAY 4 inning update: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातील तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला पहायाला मिळाले आहे.

चौथ्या दिवशी विराट आणि अक्षर पटेलच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ५७१ धावांचा डोंगर उभारला तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना बिनबाद ३ धावा केल्या आहेत. यासह भारतीय संघाने ८८ धावांची आघाडी घेतली आहे. (latest sports updates)

भारतीय संघाने उभारला ५७१ धावांचा डोंगर..

ऑस्ट्रेलिया संघाने केलेल्या ४८० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली होती. रोहित ३५ धावा करत माघारी परतला. मात्र शुभमन गिलने डाव सावरत १२८ धावांची खेळी केली.

तर सामन्याचा चौथा दिवस विराटने गाजवला. विराटने चौथ्या दिवशी फलंदाजी करताना करकीर्दीतील २८ वे शतक झळकावले.

त्याने या डावात १८६ धावांची खेळी केली. भारतीय संघ अडचणीत असताना अक्षर पटेलने जबाबदारी स्वीकारत ७९ धावांची खेळी केली.

या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या दिवस अखेर बिनबाद ३ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने ८८ धावांची आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उभारला ४८० धावांचा डोंगर..

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. ऑस्ट्रेलिया संघाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक १८० धावांची खेळी केली.

तर कॅमरुन ग्रीनने ११४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. शेवटी खालच्या फळीतील फलंदाजांनी देखील मोलाचे योगदान दिले. शेवटी टॉड मर्फीने ४१ आणि लायनने ३१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने ४८० धावांचा डोंगर उभारला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांची नावे चर्चेत

Bank Holiday In March 2026: पुढच्या आठवड्यात सलग ४ दिवस बँका बंद; गुढी पाडव्याआधीच उरकून घ्या बँकेची कामं

Gudi Padwa Speech: यंदाच्या गुढीपाडव्याला चिमुकल्यांना शिकवा हे सोपं भाषण, सोसायटीत होईल तुमच्याच मुलाची चर्चा

VIDEO : अशी ही पळवापळवी! सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलिंडर जमावानं पळवले

आधी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस – “हम जो फैसले करते हैं, खुलेआम करते हैं; काही तासांतच बेडरूममध्ये आढळला विवाहित महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT