India vs Pakistan Asia Cup Final 
Sports

Asia Cup Final : पाकिस्तान चारमुंड्या चित, भारतानं आशिया चषकावर कोरलं नाव, शेवटच्या चेंडूवर सनसनाटी विजय

India vs Pakistan Asia Cup Final : भारताच्या युवा संघाने पाकिस्तानवर शेवटच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवत आशिया चषकावर नाव कोरले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ३३७ धावा केल्या होत्या. भारताने ३३८ धावांचे आव्हान अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले.

Namdeo Kumbhar

India beat Pakistan in Asia Cup final on last ball : भारताच्या युवा संघाने पाकिस्तानच्या संघावर सनसनाटी विजय मिळवला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताचे धुरंधर सरस ठरले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३३७ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरात भारताने हे आव्हान शेवटच्या चेंडूवर यशस्वीरीत्या पार केले. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचे ३३८ धावांचे आव्हान यशस्वीरीत्या पार करत नवव्यांदा आशिया चषक विजेतेपद पटकावले.

कर्णधार लक्ष रायचंदानी, आर्यवीर सेहवाग यांची अर्धशतके आणि मनाल चौहान व मोहित उल्वा यांनी केलेल्या खेळीच्या बळावर भारताने विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत ३३७ धावांचा डोंगर उभारला होता. भारताने या आव्हानाचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. आर्यवीर सेहवागने ५८ धावांची खेळी केली, ज्यामध्ये ९ चौकार ठोकले. कर्णधार लक्ष रायचंदानी याने १०१ चेंडूंमध्ये ५ चौकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी केली.

पाकिस्तानच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी करत निर्धारित ५० षटकांत ९ बाद ३३७ धावांचा डोंगर उभा केला. उस्मान खान याने १११ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०७ धावांची शतकी खेळी केली. अब्दुल कादिर याने ५४ चेंडूत ३ चौकार आणि तब्बल ८ षटकारांच्या मदतीने ८० धावांची विस्फोटक खेळी केली.फरहान युसूफ याने ६३ धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजीत काव्या पेल याने सर्वाधिक ४ बळी टिपले, तर चिगुरुपती वेंकट याने ३ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात ३३८ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने शानदार लढा दिला. आर्यवीर सेहवाग याने ६१ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ५८ धावांची खेळी केली. कर्णधार लक्ष रायचंदानी याने संयमी खेळ करत १०१ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ८० धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

सामना अत्यंत चुरशीचा बनला असताना, तळाच्या फलंदाजांनी विजयाची सूत्रे हातात घेतली. मनाने चौहान याने ३२ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४७ धावांची वेगवान खेळी केली. शेवटच्या षटकांत विजयाची जबाबदारी सांभाळत मोहित उल्वा याने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने अवघ्या २६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावांची जिद्दी खेळी केली. भारताला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर धावांची गरज असताना, मोहित उल्वाने चौकार ठोकत भारताला ऐतिहासिक आणि सनसनाटी विजय मिळवून दिला. भारताने ५० षटकांत ९ गडी गमावून ३३९ धावा करत सामना आपल्या नावा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर यांना न्याय मिळावा, यासाठी कळव्यात आगरी-कोळी बांधवांचा कॅण्डल मार्च..

पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, विलिनीकरणासाठी पवारांवर आमदार-खासदारांचा दबाव?

BJP MLA Video: खांद्यावर kiss केलं नंतर दातात कान पकडला! भाजप आमदाराच्या व्हिडिओनं राजकीय वर्तुळात खळबळ

मनसेचा छटपूजेला विरोध, मात्र पक्षाच्याच नगरसेविकेकडून आयोजन|VIDEO

SCROLL FOR NEXT