rohit sharma and cheteshwar pujara saam tv
Sports

Team India Test Captain: रोहित शर्माची होणार सुट्टी? 'हे' ३ खेळाडू आहेत कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार

Test Captains Of Team India: रोहित नंतर कोण आहेत कसोटी संघांच्या कर्णधार पदासाठी प्रबळ दावेदार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Rohit Sharma: गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. मायदेशात आणि परदेशात देखील भारतीय संघाने दमदार खेळ केला आहे. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. त्याने अशीच कामगिरी सुरू ठेवली तर त्याला कर्णधारपदावरून काढलं जाऊ शकतात. रोहित नंतर कोण आहेत कसोटी संघांच्या कर्णधार पदासाठी प्रबळ दावेदार? जाणून घ्या.

१) रिषभ पंत:

रिषभ पंत हा कसोटी कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वात एमएस धोनीची झलक पाहायला मिळते. रिषभ पंत हा आता संघाबाहेर असला तरी त्याच्याकडे कसोटी क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे.

त्याने अनेकदा भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले आहे. २५ वर्षीय रिषभ पंतचा कसोटी क्रिकेटमधील रेकॉर्ड दमदार आहे. ही कामगिरी पाहता तो नक्कीच रोहित शर्माची जागा घेऊ शकतो. (Latest sports updates)

२)श्रेयस अय्यर:

श्रेयस अय्यर हा कसोटी क्रिकेटमध्ये ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी उतरतो. कसोटी क्रिकेटमध्ये श्रेयसचा रेकॉर्ड देखील दमदार आहे. त्याला जर आता भारतीय संघाची जबाबदारी मिळाली तर नक्कीच भारतीय संघाचा फायदा होणार आहे.

कारण तो भारतीय कसोटी संघाचा लॉन्ग टर्म कर्णधार बनू शकतो. तो मध्यक्रमात धावांचा पाऊस पाडून संघाला विजय मिळवून देत असतो. तसेच त्याला देखील आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.

३) आर अश्विन:

आर अश्विन हा भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. आर अश्विन एक हुशार खेळाडूंपैकी एक आहे. तो भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.

आर अश्विनने ९२ कसोटी सामन्यांमध्ये ४७४ धावा केल्या आहेत. तर फलंदाजी करताना त्याने ३१२९ धावा केल्या आहेत.

आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतके झळकावली आहेत. तर १२४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याची ही कामगिरी पाहता नक्कीच तो संघाची जबाबदारी स्वीकारू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

shiv sena SC Live : शिंदेंना आजच अपात्र घोषित करू शकतो का? सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती असे का म्हणाले?

कोलेस्ट्रॉल कमी करण्यापासून ते वजन नियंत्रणात ठेवण्यापर्यंत हे फळ ठरेल वरदान! फायदे एकदा वाचाच

Healthy milk drink: पुरुषांनी झोपण्यापूर्वी दुधात 'हे' मिसळून प्यावं, मिळतील 5 जबरदस्त फायदे

Pune News : पुणे विमानतळावर तरूण अचानक बेपत्ता; १८ दिवसांपासून पोलिस घेतायत शोध, नेमकं झालं काय?

Maharashtra News Live Update: हिंगणघाटच्या नांदगाव ग्रामसभेत दोन गटांत राडा; हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT