ind vs nz twitter
क्रीडा

IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून कर्णधार बाहेर! या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

India Womens vs New Zealand Womens: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या सामन्यातून कर्णधार हरमनप्रीत कौरला वगळण्यात आलं आहे.

Ankush Dhavre

India W vs New Zealand W: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. तर भारतीय महिला आणि न्यूझीलंड संघात वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे.

या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्रे मोदी स्टेडियमवर सुरु आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. ज्यात हरमनप्रीत कौरचा कर्णधार म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र ती पहिल्या सामन्यातून बाहेर पडली आहे.

हरमनप्रीत कौर संघाबाहेर पडताच स्म्रिती मंधानाचा कर्णधार म्हणून समावेश करण्यात आला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात तेजल हसब्निस आणि साइमा ठाकोरला पदार्पणाची संधी दिली गेली आहे. तर हरमनप्रीत कौर संघाबाहेर का आहे, यामागचं कारणही सांगण्यात आलं आहे. बीसीसीआयने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौर दुखापतीमुळे हा सामना खेळू शकणार नाहीये.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय महिला संघ: स्मृति मंधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटीया (यष्टीरक्षक), दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्स, दिप्ती शर्मा, तेजल हसब्निस, राधा यादव, अरुंधती रेड्डी, साइमा ठाकोर, रेणुका ठाकुर सिंग.

न्यूझीलंड महिला संघ: सुजी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिवाइन (कर्णधार), ब्रुक हॉलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टीरक्षक), लॉरेन डाउन, जेस केर, माउली पेनफोल्ड, ईडन कार्सन.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मावळ मध्ये 17 लाख 75 हजार रोकड जप्त

Mahayuti Meeting Inside Story : भाजप आणि शिवसेनेच्या बैठकीत वादग्रस्त मतदारसंघावर तोडगा; अमित शहा यांच्या निवासस्थानी नेमकं काय ठरलं?

Sharad Pawar Group 1st List: काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश, आता थेट उमेदवारी; या ४ दिग्गजांना शरद पवार गटाने दिलं तिकीट; कोणाशी होणार लढत? वाचा...

Diwali Vacation Place : मुंबईतील 'या' ठिकाणी प्लान करा दिवाळी सुट्टीचा बेत, मुलं होतील एकदम खूश

IND Vs NZ 2nd Test: चेंडू समजण्याआधीच उडाला 'हिटमॅन'चा त्रिफळा; रोहित शर्मा चौथ्यांदा बनला साउदीचा शिकार

SCROLL FOR NEXT