INDW vs AUSW 2 T20 Cricbuzz
Sports

IND W vs AUS W: भारतीय महिला क्रिकेट संघाचा दारूण पराभव; ऑस्ट्रेलियाचा ६ विकेट राखून विजय

INDW vs AUSW 2 T20: ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी भारतीय महिला संघाने माफक १३१ धावांचे लक्ष्य दिले होते.ऑस्ट्रेलियाने १९ षटकात ४ विकेट गमावत १३३ धावा करत सामना जिंकला. अ‍ॅलिसा पॅरीने सर्वाधिक नाबाद ३४ धावा केल्या.

Bharat Jadhav

Indian Womens Cricket Team Loss second T20:

ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला क्रिकेट संघाचा दुसऱ्या टी-२० सामन्यात ६ गडी राखत पराभव केला. कांगारू संघाने भारतीय संघाने दिलेले १३१ धावांचे आव्हान एक ओव्हर शिल्लक असताना पार केले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ६ विकेट राखत विजय आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाची फलंदाज अ‍ॅलिसा पॅरीने विजयी षटकार मारत संघाच्या गळ्यात विजयी माळ घातली. तिने दमदार फलंदाजी करत २१ चेंडूत ३४ धावा नाबाद खेळी केली.(Latest News)

१३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कांगारू संघाने दमदार सुरूवात केली. सलामीवीर एलिसा हिली आणि बेथ मुनी यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ७.१ षटकांत ५१ धावा केल्या. हिलीला दिप्तीने २६ धावांवर बाद केलं. हिलीला बाद केल्यानंतर दीप्ती शर्माने मुनीलाही २० धावांवर बाद केलं. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ताहिला मॅकग्राला श्रेयंका पाटीलने बाद केलं.

त्यानंतर ऍशले गार्डनरला पूजा वस्त्राकरने 7 धावांवर बाद केलं. अ‍ॅलिसा पॅरीने एका बाजुला संघर्ष चालू ठेवला आणि षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. पॅरीने नाबाद ३४ धावांची खेळी केली. यात तिने ३ चौकार आणि दोन उत्तुंग असे षटकार मारलेत.फोबी लिचफिल्डही १२ चेंडूत १८ धावा करत नाबाद राहिली. भारताकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने दोन बळी घेतले

गेल्या सामन्यात अव्वल दर्जाची कामगिरी करणारे भारतीय महिला फलंदाज दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरलेत. शेफाली वर्माला केवळ एक धाव करता आली, तर स्मृती मानधना २३ धावांवर बाद झाली. जेमिमाह रॉड्रिग्जही १३ धावा करून बाद झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT