Shubman Gill 200 runs against West Indies in Guwahati 
Sports

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

IND vs WI 2nd ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने २२३ धावांची नाबाद खेळी केली.

Bharat Jadhav

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. येथे भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने २२३ धावांची ऐतिहासिक नाबाद खेळी साकारली. या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ४०६ धावांचे ऐतिहासिक लक्ष्य गाठण्यात यश मिळवले.

शुबमन गिलचे वादळी द्विशतक आणि हिटमॅन रोहित शर्माच्या झंझावाती शतकाच्या बळावर भारताने विडिंजचा ८ विकेटने पराभव केला. विडिंजने दिलेले ४०६ धावांचे आव्हान भारताने फक्त २ विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. गिलने १६० च्या स्ट्राईक रेटने द्विशतकी खेळी केली. तर रोहित शर्मानेही वादळी शतक ठोकले. या विजयासह भारताने ३ सामन्याच्या वनडे मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.

गुवाहाटीमध्ये झालेल्या या दुसऱ्या वनडे सामन्यात अनेक विक्रम प्रस्थापित झाले. सर्वात वेगवान द्विशतक, एकाच सामन्यात ५ शतके, रोहित शर्माच्या १२००० धावा, ४०६ धावांचा यशस्वी पाठलाग...यासह अनेक विक्रम आजच्या सामन्यात झाले.

गिलचे सर्वात वेगवान द्विशतक -

कर्णधार शुभमन गिल याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. गिलने पहिल्या चेंडूपासानूच विंडिजच्या गोलंदाजांवर वर्चस्व मिळवले. गिलसमोर विडिंजची गोलंदाजी दुबळी दिसत होती. गिलने वनडे क्रिकटेच्या इतिहासातील सर्वात वेगवान द्वशतक ठोकले. गिल याच्या द्विशतकी खेळीमुळे भारताने ४०६ धावांचे आव्हान सहज पार केले. गिलने आपल्या द्विशतकी खेळीमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. गिलने २५ चौकार आणि ८ षटकार ठोकल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

SCROLL FOR NEXT