Ishan Kishan Funny Video  Twitter
Sports

Ishan Kishan Funny Video: आक्रमक ईशानचा मजेशीर अंदाज! किंग कोहलीची नक्कल केल्याचा व्हिडिओ व्हायरल

India vs Srilanka, Asia Cup 2023, Ishan Kishan Viral Video: अंतिम सामना झाल्यानंतर ईशान किशनने विराट कोहलीच्या चालण्याची नक्कल केली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

Ishan Kishan Imitates Virat Kohli Walk Viral Funny Video:

आशिया चषकाचा अंतिम सामना रविवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर जोरदार विजय मिळवला आहे. यासह आठव्यांदा आशिया चषककावर नाव कोरलं आहे. हा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू जल्लोष साजरा करताना दिसून आले. दरम्यान ईशान किशनचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

ईशान किशन हा मैदानावर असताना आपल्या आक्रमक फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन करतो. तर मैदानाबाहेर असताना तो अनेकदा मस्ती करताना दिसून येत असतो. एक व्हिडिओ सोशल तुफान व्हायरल होतोय ज्यात ईशान किशन विराट कोहलीच्या चालण्याच्या स्टाईलची नक्कल करताना दिसून येतोय. त्यावेळी संघातील इतर खेळाडूंना हसू आवरलं नाही.

श्रीलंकेचा डाव ५० धावांवर संपुष्टात..

अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. या सामन्यात त्याने ६ गडी बाद केले. यासह श्रीलंकेचा संपूर्ण डाव अवघ्या १५.२ षटकात ५० धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून ईशान किशन आणि शुबमन गिलची जोडी मैदानावर आली होती.

दोघांनी हाणामारी करत सामना ६.१ षटकात भारतीय संघाला जिंकून दिला. या डावात ईशानने २३ धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने २७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. (Latest sports updates)

आशिया चषकात त्याने भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने साखळी फेरीतील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात ८२ धावांची तुफानी खेळी केली होती. या सामन्यात त्याने हार्दिक पंड्यासोबत मिळून महत्वाची भागीदारी केली होती. त्याने या स्पर्धेतील ४ डावात १४३ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT