sanju samson twitter
Sports

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

India vs South Africa 4th T2OI, Team India Record: संजू सॅमसनने खेचलेला पहिलाच षटकार भारतीय संघासाठी रेकॉर्डब्रेकिंग षटकार ठरला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना जोहान्सबर्गच्या मैदानावर पार पडला. मालिकेतील सुरुवातीच्या ३ सामन्यांमध्ये टॉस गमावल्यानंतर अखेर चौथ्या सामन्यात भारताने चौथ्या सामन्यात टॉस जिंकला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानावर आली होती. दोघांची डावाची सुरुवात करताना संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या. यादरम्यान संजू सॅमसनने भारतीय संघासाठी १५०० वा षटकार खेचला आहे.

संजू सॅमसनचा रेकॉर्डब्रेकिंग षटकार

या डावात सलामीला आलेल्या संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. दक्षिण आफ्रिकेकडून दुसरे षटक टाकण्यासाठी गेराल्ड कोएत्जी गोलंदाजीला आला होता.

या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर संजूने डीप मिडविकेटच्या दिशेने खणखणीत षटकार खेचला. हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांनी खेचलेला १५०० वा षटकार ठरला आहे. असा रेकॉर्ड करणारा भारतीय संघ केवळ दुसराच संघ ठरला आहे. यापूर्वी हा कारनामा केवळ वेस्टइंडीजला करता आला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग ११:

दक्षिण आफ्रिका (Playing XI): रायन रिकल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जान्सन, जेराल्ड कोएट्झी, अँडिले सिमलाने, केशव महाराज, लुथो सिपामला

भारत (Playing XI): संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रामनदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जीएसटी पथकाची नाशिकमध्ये छापेमारी

New Marathi Serial Update : मनोरंजनाची डबल मेजवानी, २ मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

PostWork Out Meals: पोस्ट वर्कआउट मध्ये काय खावं? फिटनेससाठी हे' सुपरफूड्स उत्तम पर्याय

Pune : पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार रस्त्यावर! हिंजवडीच्या सरपंचाला झापलं | VIDEO

योग केंद्रातून बाहेर येताच छातीत कळ; पायऱ्यांवर आला हार्ट अटॅक, जागीच मृत्यू; CCTV व्हायरल

SCROLL FOR NEXT