Ind vs Pak Saam tv
Sports

Ind vs Pak : बाय बाय पाकिस्तान! सलग दुसऱ्या पराभवानंतर नेटकऱ्यांनी पाकिस्तानची उडवली खिल्ली, मीम्स पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

Ind vs Pak Memes : चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव झाला आहे. पाकिस्तानचा दुसरा पराभव टीम इंडियाने केला. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाहायला मिळाला.

Yash Shirke

चॅम्पियन्स ट्रॉफीमधला हायव्होल्टेज सामन्यामध्ये भारताचा विजय झाला. भारताच्या संघाने पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. हा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताचा दुसरा विजय आहे. भारताने आजचा सामना जिंकल्यानंतर पाकिस्तानचा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आव्हान संपुष्टात आल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे.

महाकुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या आयआयटी बाबाने आजच्या भारत-पाकिस्तानचा सामना भारताचा संघ हारणार अशी भविष्यवाणी केली होती. त्याची ही भविष्यवाणी खोटी ठरल्याने त्यासंबंधित मीम्स व्हायरल होत आहेत.

भारताने पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळला. या सामन्यात बांगलादेशवर ६ गडी राखून भारताने विजय मिळवला होता. आता आजच्या भारत-पाकिस्तान सामन्यामध्येही भारताने पाकिस्तानला ६ गडी राखून धूळ चारली आहे. सलग दुसऱ्या विजयामुळे भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या उपांत्य फेरीतली जागा काहीशी पक्की केली आहे.

दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा हा दुसरा पराभव आहे. पहिल्यांदाच पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद देण्यात आले. पण यजमानच पहिले चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडतील असे म्हटले जात आहे. यजमानपद असताना सलग दोन सामने हरण्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड पाकिस्तानच्या संघाने केले आहे.

दरम्यान पाकिस्तानवर भारताने केलेल्या विजयाचा देशभरात जल्लोष होत आहे. सोशल मीडियावरही लोक आनंदाने विजय साजरा करत आहेत. या सामन्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक मीम्स पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Diljit Dosanjh: एमी अवॉर्ड्स 2025मध्ये दिलजीत दोसांझची एन्ट्री; 'अमर सिंग चमकीला'साठी मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन

Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

SCROLL FOR NEXT