India vs New zealand Playing 11 Prediction Saam tv news
Sports

Team India Playing XI: न्यूझीलंडविरूद्ध टीम इंडियाची प्लेइंग ११ ठरली! या २ खेळाडूंना मिळणार संधी

India vs New zealand Playing 11 Prediction: न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यासाठी या २ खेळाडूंना संधी मिळू शकते.

Ankush Dhavre

Team India Playing XI:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना धर्मशाळेच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

बांगलादेशविरूद्धचा सामना सुरू असताना हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येणार नाही. जाणून घ्या कोणत्या ११ खेळाडूंना या सामन्यासाठी संधी दिली जाऊ शकते.

सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा हा सामना धर्मशाळेतील हिमाचल क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगणार आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता खूप कमी आहे. या सामन्यासाठी ३ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकी गोलंदाजांना प्लेइंग ११ मध्ये संधी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)

भारतीय संघात होऊ शकतात २ मोठे बदल...

हार्दिक पंड्याचं न खेळणं हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. कारण भारतीय संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे. हार्दिक पंड्यासह शार्दुल ठाकुरला देखील बाकावर बसावं लागेल.

इंडियन एस्क्प्रेसने दिलेल्या वृत्तानूसार हार्दिक पंड्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. तर शार्दुल ठाकुरच्या जागी मोहम्मद शमीला संधी दिली जाऊ शकते.

असा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड..

भारत आणि न्यूझीलंड हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत. गेल्या २० वर्षांपासून भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडला एकदाही पराभूत करू शकलेला नाही. भारतीय संघाने २००३ मध्ये न्यूझीलंडचा पराभव केला होता.

त्यानंतर आयसीसीच्या स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

रात्री नुडल्स खाऊन कुटंब झोपलं अन्....; ५ जणांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट

Monday Horoscope: या 5 राशींचं नशीब पालटणार? अचानक पडणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT