IND vs NZ SAAM TV
Sports

IND vs NZ ODI: आधीच सुमार कामगिरी, त्यात पावसाची भर; टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका 1-0ने गमावली

न्यूझीलंडच्या संघाने 18 षटकांत केवळ 104 धावा केल्या होत्या. दरम्यान पाऊस सुरू झाला आणि सामना रद्द झाला.

साम टिव्ही ब्युरो

IND vs NZ 3rd ODI: न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाच 1-0 असा पराभव झाला आहे. मालिकेतील शेवटचा सामना क्राइस्टचर्चमध्ये खेळला गेला.  (Sports News)

मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 47.3 षटकांत 220 धावा केल्या. टीम इंडियाच्या या लक्ष्यांचा सामना करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने 18 षटकांत केवळ 104 धावा केल्या होत्या. दरम्यान पाऊस सुरू झाला आणि सामना रद्द झाला. (Latest Marathi News)

या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला होता. यानंतरचा दुसरा आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी सुमार राहिली.तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला 50 षटकेही पूर्ण खेळता आलं नाही. संघाने 47.3 षटकांत सर्वबाद 219 धावा केल्या.

यादरम्यान वॉशिंग्टन सुंदर आणि श्रेयस अय्यर यांनी संघाची धुरा सांभाळली. सुंदरने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने 64 चेंडूत 51 धावा केल्या. सुंदरच्या खेळीत 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. श्रेयस अय्यरने 59 चेंडूत 49 धावा केल्या. त्याने 8 चौकार मारले. या दोन खेळाडूंशिवाय कोणीही विशेष काही करू शकले नाही. शिखर धवन २८ धावा करून बाद झाला.

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने 18 षटकांत 1 गडी गमावून 104 धावा केल्या. मात्र पावसामुळे सामना रद्द झाला. न्यूझीलंडकडून फिन ऍलनने 57 धावांची शानदार खेळी केली. त्याने 54 चेंडूंचा सामना करत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. डेव्हन कॉनवे 38 धावा करून नाबाद राहिला. त्याने 51 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार मारले. केन विल्यमसनही नाबाद राहिला.

टीम इंडियाकडून उमरान मलिकने एकमेव विकेट घेतली. त्याने 5 षटकात 31 धावा दिल्या. अर्शदीप सिंगनेही प्रभावी गोलंदाजी केली. त्याने 5 षटकात 21 धावा देत मेडन ओव्हर घेतला. दीपक चहरने 5 षटकात 30 धावा दिल्या. वॉशिंग्टन सुंदरने 3 षटकात 16 धावा दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

SCROLL FOR NEXT