IND vs NZ Twitter/ @BCCI
Sports

IND vs NZ: विश्वचषकानंतर होणारा भारताचा न्युझीलंड दौरा स्थगित?

टी -20 विश्वचषकानंतर (ICC Wolrd Cup 2021) भारतीय क्रिकेट संघाला (Team India) नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर (IND vs NZ) जायचे आहे.

वृत्तसंस्था

टी -20 विश्वचषकानंतर (ICC Wolrd Cup 2021) भारतीय क्रिकेट संघाला (Team India) नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर (IND vs NZ) जायचे आहे. या दौऱ्यात टीम इंडिया किवींविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही देशांदरम्यान खेळली जाणारी दोन कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC Final) एक भाग असणार आहे. पण आता बातम्या येत आहेत की न्यूझीलंड क्रिकेटने हा दौरा पुढे ढकलला आहे. माध्यमांनुसार, न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रवक्त्याने दौरा रद्द केल्याची पुष्टी केली आहे. तथापि, आतापर्यंत दौरा पुढे ढकलण्याबाबत बीसीसीआय (BCCI) आणि क्रिकेट न्यूझीलंडकडून (New Zealand Cricket) कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.

स्थानिक माध्यमांनुसार, न्यूझीलंड क्रिकेटच्या प्रवक्त्याने प्युटर टूर प्रोग्रामनुसार टीम इंडिया या हंगामात न्यूझीलंड दौरा करणार नाही याची माहिती दिली आहे, हा भारत दौरा 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. हा दौरा ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये खेळल्या जाणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर पुन्हा घेतला जाऊ शकतो. कोरोना संसर्गासंदर्भात न्यूझीलंडमध्ये क्वारंटाईनचे कडक नियम आहेत. याचा अर्थ असा की विश्वचषकानंतर किवी क्रिकेटपटू डिसेंबरच्या सुरुवातीपूर्वी घरी परतणार नाहीत. न्यूझीलंडमध्ये आल्यानंतर त्यांना १४ दिवस विलगीकरणात रहावं लागणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT