washington sundar twitter
क्रीडा

Washington Sundar: W,W,W....रोहितचा हुकमी एक्का चमकला! त्या 4 षटकांत गेम कसा फिरला?

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे.

Ankush Dhavre

Washington Sundar, India vs New Zealand: पु्ण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत आणिा न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने प्लेइंग ११ मध्ये ३ मोठे बदल केले.

मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप आणि शुभमन गिल यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान वॉशिंग्टन सुंदरने संधीचं सोनं करत भारतीय संघाला लागोपाठ ३ धक्के दिले आहेत.

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, न्यूझीलंडला सुरुवातीला २ मोठे धक्के बसले. मात्र रचिन रविंद्रने संघाचा डाव सावरला.

रचिनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने २०० धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीच्या २ सेशनमध्ये न्यझीलंडच्या फलंदाजांनी टीचून फलंदाजी केली. मात्र त्यानंतर तिसऱ्या सेशनमध्ये वॉशिंग्टन सुंदरची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याने ४ षटकात न्यूझीलंडच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली.

न्यूझीलंडला लागोपाठ ३ धक्के

सुंदरने सुरुवातीला रचिन रविंद्रला बाद करत माघारी धाडलं. त्याने ६० व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर रचिन रविंद्राला क्लिन बोल्ड केलं. रचिन ६५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर टॉम ब्लंडेललाही क्लिन बोल्ड करत माघारी धाडलं. त्यानंतर ६३ व्या षटकात त्याने डॅरील मिशेलला पायचित करत माघारी धाडलं. मिशेलला अवघ्या १८ धावा करता आल्या.

पहिल्या कसोटीनंतर मिळालं संघात स्थान

या मालिकेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडला होता.या सामन्यासाठी सुंदरला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. पहिला कसोटी सामना झाल्यानंतर सुंदरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्यानंतर त्याला प्लेइंग ११ मध्येही स्थान दिलं गेलं आहे. या संधीचा त्याने चांगला फायदा घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जागावाटपात शिंदेंची तडजोड नाही? सर्व्हेविरोधात एल्गार? दिल्लीवारीतून जागांचा तिढा सुटणार?

Sanjiv Khanna: संजीव खन्ना असतील देशाचे पुढील सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

Ramtek Assembly Constituency : रामटेकवरुन महाविकास आघाडीत रामायण? ठाकरेंकडून उमेदवारी,काँग्रेसच्या हालचाली, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार भारताचे सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबर रोजी घेतील शपथ

Congress First Candidate List : काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीसांविरोधात शिलेदार उतरवला, वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT