IND vs Eng Test Series Saam Tv
क्रीडा

Team india : टीम इंडियात चाललंय काय? प्रतिस्पर्ध्यांना 'पाणी पाजणारे' खतरनाक खेळाडूच होणार संघाबाहेर

IND vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडच्या संघात होणारी ५ सामन्यांची मालिका २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही कसोटी मालिका ११ मार्चपर्यंत चालणार आहेत. पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ भारताचा दौरा करणार आहे. मात्र भारतीय संघाची दमदार खेळाडू मालिकेला मुकणार असल्याने टीम इंडियामध्ये काय चालू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहेत.

Bharat Jadhav

IND vs Eng Test Series :

टीम इंडिया आणि इंग्लंडच्या संघात ५ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. दोन दिग्गज खेळाडू या मालिकेला मुकणार असल्याने टीम इंडियाच्या गोलंदाजी आणि फलंदाजीला फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा भेदक गोलंदाज मोहम्मद शमी पहिल्या दोन कसोटी सामने खेळू शकणार नाहीये. तर सूर्यकुमारदेखील मालिकेला मुकणार आहे. (Latest News)

मोहम्मद शमीने अद्याप गोलंदाजीचा सराव केलेला नाहीये. त्याला एनसीएत जाऊन आपला फिटनेस व्यवस्थित असल्याचं दाखवावं लागणार असल्याचं भारतीय क्रिकेट मंडळाच्या एका सुत्राने सांगितलं. अद्याप त्याच्या प्रकृतीविषयी कोणतीच अपडेट आली नसल्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये त्याचं खेळणं अवघड वाटत आहे. तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवही संघाबाहेर राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याला हर्नियाचा त्रास असून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हर्नियाच्या ऑपरेशननंतर त्याला मैदानावर सराव करण्यासाठी ८-९ आठवडे लागू शकतात. दरम्यान सूर्यकुमार आयपीएलदरम्यान (IPL) तंदुरुस्त होईल,असं म्हटलं जात आहे. दरम्यान अद्याप या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची (Indian Team) घोषणा करण्यात आलेली नाहीये. भारत आणि इंग्लंडच्या संघात होणारी ५ सामन्यांची मालिका २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही कसोटी मालिका ११ मार्चपर्यंत चालणार आहे. पाच कसोटी खेळण्यासाठी इंग्लंडचा संघा भारताचा दौरा करणार आहे.

यावेळी बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ (England team) भारतात येणार आहे. स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या संघाने आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. भारतामध्ये ३ वर्षानंतर दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका (Test series) खेळली जाणार आहे. या दोन्ही देशात २०२१ मध्ये कसोटी सामने झाले होते. ही मालिका टीम इंडियाने (Team India) ३-१ च्या फरकाने जिंकली होती.

नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावेळी मोहम्मद शमीचा संघात समावेश नव्हता. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कसोटी संघाची घोषणा केली तेव्हा तो संघाचा भाग होता, परंतु नंतर शमी तंदुरुस्त नसल्यामुळे कसोटी मालिकेतून शमीला बाहेर बसवलं होतं. शमीच्या जागी आवेश खानला संघात स्थान मिळाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : हिंगोलीत अपक्ष उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर आघाडीवर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT