Ind vs Eng Saam tv
Sports

Ind vs Eng : कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारत मजबूत स्थितीत, चौथ्या दिवशी टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी

IND vs ENG 4th Test day 3 : या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडने भारताला १९२ धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने एकही गडी न गमावता ४० धावा कुटल्या आहेत.

Vishal Gangurde

IND vs ENG 4th Test day 3 Updates : 

भारत आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडने भारताला १९२ धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने एकही गडी न गमावता ४० धावा कुटल्या आहेत. कसोटी सामन्याच्या या तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वाल ३४ तर रोहित शर्मा २४ धावांवर नाबाद खेळत होता. भारताला विजयासाठी आता फक्त १५२ धावांची गरज आहे. (Latest Marathi News)

इंग्लंडने पहिल्या डावात ३५३ धावा कुटल्या. त्यानंतर इंग्लंडने टीम इंडियाला ३०७ धावांवर गुंडाळलं. त्यामुळे पहिल्या डावाच्या खेळामुळे इंग्लंडला ४६ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ १४५ धावांवर गारद झाला. त्यामुळे भारताला १९२ धावांचं आव्हान मिळालं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंग्लंडने दुसऱ्या डावात सलामीवर जॅक क्राउलीने ६० धावा केल्या. क्राउली व्यतिरिक्त जॉनी बेयरस्टोने ३० धावा कुटल्या. भारतासाठी आर अश्विन आणि कुलदीप यादवने अनुक्रमे पाच आणि चार गडी बाद केले. अश्विनने आतापर्यंत ३५ वेळा पाच गडी बाद केले. यावेळी रवींद्र जडेजाने १ गडी बाद केलं.

रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्याविरोधात इंग्लंडचा टीम कर्णधार बेन स्टॉक्सने मोठी खेळी खेळली. इंग्लंडने दुसऱ्या डावात स्पिनरच्या मदतीने सुरुवात केली. डावाच्या सुरुवातीला फिरकीपटूंना षटक दिलं. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी मिळून ८ षटकात ४० धावा केल्या. इंग्लंडने सुरुवातीला जलद गोलंदाजांचा वापर केला नाही. त्यामुळे उद्या इंग्लंड जलद गोलंदाजांचा वापर शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ओबीसी नेते लक्ष्मण हाके अंजनगाव खेलोबामध्ये दाखल

मालेगाव महापालिकेत पुन्हा राडा; इस्लाम आणि MIM च्या नगरसेवकांची एकमेकांना धक्काबुक्की

पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूरसह उत्तर महाराष्ट्राला पावसाने झोडपलं; शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार! रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहनं पाण्यात बुडाली; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Natural Hair Growth Tips: लांब आणि दाट केसांसाठी 'दह्याचा' असा करा वापर; घरच्या घरी मिळवा पार्लरसारखी ट्रिटमेंट

SCROLL FOR NEXT