tilak varma twitter
Sports

IND vs ENG: आर्चरने 150.3KMPH च्या स्पीडने टाकला बॉल, तिलक वर्माने रॉकेट स्पीडने पाठवला मैदानाबाहेर - VIDEO

Tilak Varma Six On Jofra Archer Bowling: भारतीय संघाचा युवा आक्रमक फलंदाज तिलक वर्माने तुफान फटकेबाजी करत जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार खेचला.

Ankush Dhavre

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर ताशी १५० च्या गतीने गोलंदाजी करत होता. पण भारतीय फलंदाजांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी जोफ्रा आर्चरवर चांगलाच हल्ला चढवला.

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर तिलक वर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने जोफ्रा आर्चरच्या एकाच षटकात २ खणखणीत षटकार खेचले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तिलक वर्माचे खणखणीत षटकार

तर झाले असे की,भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना, इंग्लंडकडून पाचवे षटक टाकण्यासाठी जोफ्रा आर्चर गोलंदाजीला आला. ताशी १५० च्या गतीने गोलंदाजी करणाऱ्या आर्चरला तिलक वर्माने चांगलाच धुतला.

षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने ऑफ साईडच्या दिशेने चौकार मारला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरुन खणखणीत षटकार मारला. हा षटकार इतका लांब गेला की, चेंडू मैदानाबाहेर जाऊन पडला. त्यानंतर षटकातील चौथ्या चेंडूवरही त्याने किपरच्या डोक्यावरुन षटकार मारला.

इंग्लंडने केल्या १६५ धावा

इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला २० षटकअखेर १६५ धावा करता आल्या. इंग्लंकडून फलंदाजी करताना जोस बटलरने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर जेमी स्मिथने २२ धावा केल्या. शेवटी ब्रायडन कर्सने ३१ धावा केल्या. इंग्लंडने २० षटकअखेर १६५ धावा करत भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी १६६ धावांचं आव्हान ठेवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT