IND Vs BAN 3rd ODI live match Streaming/BCCI SAAM TV
Sports

IND Vs BAN, 3rd ODI : भारत-बांगलादेश तिसरी वनडे कधी-कुठे बघाल? जाणून घ्या एका क्लिकवर

भारत-बांगलादेश यांच्यात तिसरा वनडे सामना उद्या, शनिवारी होत आहे.

Nandkumar Joshi

IND Vs BAN, 3rd ODI Match Live Streaming : बांगलादेशविरुद्ध दोन्ही एकदिवसीय सामन्यांत पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया शुक्रवारी अखेरचा वनडे सामना जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. भारतानं पहिला सामना अवघ्या एका विकेटनं गमावला. तर दुसऱ्या सामन्यात पाच धावांनी पराभूत व्हावं लागलं. तिसऱ्या वनडे सामन्यात भारतावर क्लीन स्वीपचं संकट घोंघावत आहे. क्लीन स्वीप टाळण्यासाठी हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. बांगलादेशनं जर हा सामनाही जिंकला तर, तो क्रिकेट इतिहासातील सुवर्ण क्षण त्यांच्यासाठी असणार आहे.

भारतीय संघ सध्या दुखापतग्रस्त खेळाडू आणि फिटनेसच्या समस्यांमुळं त्रस्त आहे. मालिकेआधीच टीम इंडियाकडे २० खेळाडू होते. मात्र, दोन सामन्यांनंतर टीम इंडियाकडे पर्याय म्हणून केवळ १४ खेळाडू उरले आहेत. टीम इंडियाचे सहा खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यातील रोहित शर्मा हा महत्वाचा खेळाडू मुंबईला परतला आहे. त्याची जागा केएल राहुल घेणार आहे.  (Cricket News)

कधी-कुठे आणि केव्हा बघाल सामना?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा वनडे सामना शनिवारी, १० डिसेंबरला होणार आहे.

वनडे मालिकेतील हा अखेरचा सामना बांगलादेशच्या चटगाव येथील जाहुर अहमद स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल.

भारत-बांगलादेश यांच्यातील तिसरा सामना सकाळी साडेअकरा वाजता सुरू होईल. नाणेफेक ११ वाजता होईल.

या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल.

भारत-बांगलादेश तिसऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव अॅपवर पाहू शकता. (Team India)

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, मोहम्मद सिराज, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद,अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, कुलदीप यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'नीट'मुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर, कधी होणार महाटीईटीची परीक्षा? नवी तारीख जाहीर

Maharashtra News Live Update: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ३ ट्रकचा भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

Sugar Free Sweet Recipes : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा 'हा' शुगर फ्री हलवा, मधुमेही रूग्णही आवडीने खातील

Vastu Shastra: पैशाची चणचण, जीवनात अडी-अडचण येतेय? अंथरुणातील 'ही' चूक बदलतेय तुमची ग्रह दशा

गुजरातमध्ये पैशांचा पाऊस, पोती भरून भरून उधळल्या गायकावर नोटा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT