ऑस्ट्रेलियाचा अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्कसोबत पंगा घेणं यशस्वी जयस्वालला चांगलच महागात पडत आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात यशस्वी जयस्वाल स्टार्कला स्लेज करताना दिसून आला होता.
त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये स्टार्कने जयस्वालला बाद करत माघारी धाडलं आहे. मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना, यशस्वी जयस्वाल अवघ्या ४ धावांवर बाद होऊन माघारी परतला.
दरम्यान जयस्वालला बाद केल्यानंतर स्टार्कने त्याला चिडवलं. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
ऑस्ट्रेलियाला चांगलच माहीत आहे की, जयस्वाल आक्रमक फलंदाजी करणार. त्याला पहिलाच चेंडू जर रडारमध्ये मिळाला, तर तो हल्ला करु शकतो. जयस्वालच्या या मजबूत पक्षाचा ऑस्ट्रेलियाने चांगलाच फायदा घेतला.
स्टार्कने पहिलाच चेंडू फुल लेंथवर टाकला. या चेंडूवर त्याने चौकार खेचला. त्यानंतर पुढचाच चेंडू स्टार्कने मिडल आणि ऑफ स्टम्पच्या मध्ये टाकला. या चेंडूवर त्याने फ्लिक शॉट मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही.
त्यामुळे शॉर्ट मिडविकेटला असलेल्या मिचेल स्टार्कने सोपा झेल टिपला आणि त्याला बाद करत माघारी धाडलं. दरम्यान जयस्वालला बाद केल्यानंतर स्टार्क त्याला जीभ दाखवताना दिसून आला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला ४४५ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करतानात पुन्हा एकदा ट्रेविस हेड भारतीय संघाला नडला.
हेडने या डावात १५२ धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने १०१ धावा केल्या. तर अॅलेक्स कॅरीने ७० धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा डाव४४५ धावांवर आटोपला.
भारतीय संघाला फलंदाजीतही हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. भारतीय संघाला दुसऱ्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. जयस्वाल अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. शुभमन गिल १ धाव करत माघारी परतला. तर विराट कोहली अवघ्या ३ धावा करत तंबूत परतला. भारतीय संघाने आतापर्यंत ३ गडी बाद ३९ धावा केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.