toss saam tv
Sports

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

Perth Test Match Record: टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात टॉस बॉस बनणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

क्रिकेट चाहत्यांना ज्या दिवसाची आतुरता होती तो दिवस अखेर आला आहे. आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात टॉस बॉस बनणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

पर्थमध्ये टॉस पुन्हा बॉस बनणार का?

ऑप्टस स्टेडियममध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या टेस्ट सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर टॉस हाच बॉस बनल्याचं दिसून आलं आहे. रेकॉर्डनुसार, जो टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करेल तो मॅच जिंकेल, असा दावा आहे.

काय सांगतो रेकॉर्ड?

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ऑप्टस स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 4 टेस्ट सामने खेळवण्यात आले आहेत. या ठिकाणी प्रत्येक वेळी ऑस्ट्रेलियाच्या टीमने टॉस जिंकला. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी टॉस जिंकल्यानंतर कांगारूंनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि योगायोग म्हणजे टेस्ट सामन्यात चार वेळा फलंदाजी केल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमने सर्व सामने जिंकलेत.

आता सुरु असलेल्या पर्थ टेस्टमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा सामना टीम इंडिया जिंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पर्थ टेस्टसाठी कशी आहे टीम इंडियाची प्लेईंग ११?

केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नीतीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

SCROLL FOR NEXT