Ind vs Aus Semi Final Saam Tv
Sports

Ind vs Aus : विराट कोहली बाद होताच केएल राहुलची 'ती' रिअ‍ॅक्शन व्हायरल, पाहा व्हिडीओ

Ind vs Aus Semi Final Virat Kohli Wicket: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्येविराट कोहली ८४ धावांवर बाद झाला. फक्त १६ धावांनी विराटचे शतक हुकले.

Yash Shirke

Ind Vs Aus Live : चॅम्पियन्स ट्रॉफीतला उपांत्य फेरीतला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना सुरु आहे. भारताची फलंदाजी सुरु आहे. भारतासमोर २६५ धावांचे लक्ष आहे. रोहित शर्मा, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल बाद होऊन मैदानाबाहेर पडले. अशात विराट कोहली चुकीचा शॉट मारत बाद झाला. विराट ८४ धावांवर खेळत होता.

पहिले चार फलंदाज बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी भागीदारीची जबाबदारी घेतली. एका बाजूने विराट कोहली सावधगिरीने खेळत होता. तर दुसऱ्या बाजूने केएल राहुल हा तुफान फटकेबाजी करत होता. त्यात विराटने ८४ धावांवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमध्ये विराट बाद झाला. फक्त १६ धावांनी त्याचे शतक हुकले.

विराटने चुकीचा ॲडम झाम्पाने टाकलेल्या बॉलवर जोरदार शॉट मारला आणि त्याची कॅच बेन द्वारशुईसने घेतली. विराट चुकीच्या शॉटवर बाद झाल्याने केएल राहुलला फार वाईट वाटले. राहुल विराटकडे पाहून 'अरे मी मारत होतो ना..' असे म्हणाला. त्याची ही रिएक्शन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. राहुलप्रमाणे प्रत्येक भारतीय चाहत्याला वाटले होते की विराटने शतक पूर्ण करावे.

चॅम्पियन्स ट्रॉफीतला उपांत्य फेरीतला पहिला सामना सुरु आहे. सामन्यामध्ये टॉस जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने ५० षटकांमध्ये २६४ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने ३ विकेट्स तर वरुण चक्रवर्तीने २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारताचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT