virat kohli twitter
Sports

IND vs AUS: 'धोनीकडून शिक आणि निवृत्त हो..', किंग कोहलीला रिटायरमेंटचा सल्ला

Virat Kohli, IND vs AUS 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

Ankush Dhavre

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत शानदार शतकी खेळी केली होती. मात्र त्यानंतर पुढील २ सामन्यांमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात विराट अवघ्या ३ धावा करत माघारी परतला.

यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल स्वस्तात माघारी परतल्यानंतर, विराटने खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करायला हवी होती. मात्र असं काहीच झालेलं नाही. केवळ या सामन्यात नव्हे, तर गेल्या सामन्यातही तो स्वस्तात माघारी परतला होता.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना, विराटची बॅट चांगलीच तळपते. मात्र हा दौरा त्याच्यासाठी हवा तितका खास राहिलेला नाही. पर्थ कसोटीतील दुसऱ्या डावात त्याने शानदार शतकी खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेतली. हा सामना भारताने २९५ धावांनी जिंकला.

पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर विराटचा फॉर्म परतलाय, असं वाटलं होतं. मात्र अॅडलेड कसोटीत तो पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात ११ धावांवर बाद होऊन परतला. हा सामना भारताने १० गडी राखून गमावला.

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विराट कमबॅक करेल असं वाटलं होतं. मात्र गाबाच्या मैदानावर विराट पुन्हा पाचव्या स्टम्पवर जाणाऱ्या चेंडूवर आऊट होऊन माघारी परतला आहे. आता विराटने निवृत्ती घ्यावी अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

एका युझरने पोस्ट शेअर करत लिहिले की, ' विराट कोहलीने धोनीकडून शिकायला हवं आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. बीसीसीआय एकेकाळी ग्रेट पण आता कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या खेळाडूंवर वेळ वाया घालवत आहे.' तर आणखी एका युजरने लिहिले की, ' विराटने आता दुसऱ्या इनिंगमध्ये धावा केल्या पाहिजे. जर पाऊस पडला, तर पुढील कसोटीत त्याने शतक झळकावलं पाहिजे. जर असं झालं नाही, तर त्याने निवृत्ती जाहीर करावी.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT